मुंबई : अतिवृष्टी व पुरामुळे खरडून गेलेल्या शेतजमिनीला पूर्वस्थितीत आणण्यासाठी लागणारी माती, गाळ, मुरूम, कंकर मोफत पुरवण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. याबाबतचे परिपत्रक महसूल विभागाने शुक्रवारी जारी केले.
शेतकऱ्यांना त्यांची जमीन पुन्हा लागवडीयोग्य व सुपीक करण्यासाठी लागणाऱ्या माती, गाळ, मुरूम, कंकर या गौण खनिजांवरील रॉयल्टी माफीच्या निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे सक्त आदेश बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.
राज्याच्या अनेक भागांत अतिवृष्टी व पूरस्थिती निर्माण झाल्याने शेतपिकांचे नुकसान झाले. शिवाय, मनुष्य व पशुहानी यासह शेतजमीन खरडून जाणे, अतिरिक्त गाळ साठणे आणि जमिनीचा सुपीकस्तर वाहून जाण्याच्या घटना घडल्या.
जमिनीच्या सुपीकतेसाठी महसूलमंत्री बावनकुळे यांचा निर्णय
नैसर्गिक आपत्तीग्रस्त व्यक्तींना घर, गुरांचा गोठा, शेत व विहीर यांसाठी आवश्यक पाच ब्रास गौण खनिजाच्या वापरासाठी स्वामित्वधनातून सूट मिळेल. शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. - चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री, महाराष्ट्र






