Saturday, November 15, 2025

Nowgam Police Station Blast : चार दिवसांत देशाला दुहेरी धक्का! श्रीनगरच्या नौगाम पोलीस स्टेशन स्फोटाचे नेमकं कारण काय?

Nowgam Police Station Blast : चार दिवसांत देशाला दुहेरी धक्का! श्रीनगरच्या नौगाम पोलीस स्टेशन स्फोटाचे नेमकं कारण काय?

श्रीनगर : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी, १० नोव्हेंबर रोजी i-२० कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण गंभीर जखमी झाले. या घटनेने राजधानीतील सुरक्षेच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. या घडामोडींच्या केवळ चार दिवसानंतर, शनिवारी जम्मू आणि काश्मीरमधील एका पोलीस ठाण्यातही मोठा स्फोट झाला. या हल्ल्यात ९ जणांचा मृत्यू झाला आणि काहीजण गंभीर जखमी झाले. सध्या एका दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याने, ही घटना मानवी चूक होती की दहशतवादी हल्ला, असा प्रश्न प्रचलित झाला आहे. सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी तपास करत आहेत आणि संबंधित घटकांवर कडक कारवाई करण्याची तयारी दर्शवली आहे.

श्रीनगरच्या नौगाम पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

श्रीनगरच्या नौगाम परिसरातील नौगाम पोलीस ठाण्यात शनिवारी सकाळी एक भयंकर स्फोट झाला. धमाक्याचे आवाज परिसरात दूरपर्यंत ऐकू गेले, ज्यामुळे स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. सध्या मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २७ हून अधिक जण जखमी आहेत. अनेक जखमींची अवस्था गंभीर असल्याचे आरोग्य अधिकारी सांगत आहेत. तसेच, काही व्यक्ती अद्याप गायब आहेत आणि त्यांचा शोध सुरू आहे. त्यामुळे या घटनेत मृतांचा आकडा अजून वाढू शकतो. सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी उपस्थित असून, तपास सुरू आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे आणि घटनास्थळी तातडीने मदत पोहचवली आहे.

मानवी चूक की दहशतवादी हल्ला? FSL तपास सुरू

दिल्लीतील i-२० कार स्फोटाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीपासूनच हा प्रश्न उपस्थित झाला होता की, हा मानवी चूक होती की दहशतवादी हल्ला. सूत्रांच्या माहितीनुसार, घटनास्थळी मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य आढळले. FSL (Forensic Science Laboratory) पथक गेल्या दोन दिवसांपासून तपास करत आहे. तज्ज्ञांचे प्राथमिक निरीक्षण असे आहे की, स्फोटकं हाताळताना फक्त मानवी चूक झाली असेल, असे वाटत नाही. त्यांच्या मते, तापमान, रासायनिक रचना आणि काही विशेष घटकांच्या संपर्कामुळे स्फोट झाला असावा. सध्या तपासात असेही स्पष्ट झाले आहे की, स्फोटक साहित्य हरयाणातील फरीदाबाद येथून आणण्यात आले होते. तसेच, FSL पथक तपासत आहे की हा स्फोट रासायनिक प्रक्रियेतून घडला की त्यासाठी टायमर वापरण्यात आला होता. सुरक्षा आणि तपास पथकांनी घटनास्थळी सखोल तपास सुरू ठेवला आहे, तर तपासाची अंतिम अहवाल येईपर्यंत घटनेच्या स्वरूपावर निष्कर्ष न करता तपास सुरू ठेवणे आवश्यक असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

३०० फुट दूर मानवी अवशेष

श्रीनगरच्या नौगाम पोलीस ठाण्यात सोमवारी झालेला स्फोट अतिशय भीषण होता. पोलिस स्टेशनचे मोठे नुकसान झाले असून बचाव पथकाला ढिगारे हटविण्यात आणि लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात मोठा अडथळा आला. तथापि, अग्निशमन दल वेळेत पोहोचल्याने आग लवकर आटोक्यात आली. घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, स्फोट इतका प्रचंड होता की मानवी अवशेष, हात ३०० फुटावर सापडले. स्फोटाचा आवाज श्रीनगरमधील दक्षिण भागात कित्येक किलोमीटरपर्यंत ऐकू गेला. प्राथमिक तपासानुसार, पोलीस स्टेशनमध्ये फरीदाबादहून आणलेले ३५० किलो अमोनियम नायट्रेट साठवले होते. त्याची हाताळणी करताना मानवी चूक झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. अमोनियम नायट्रेट हा एक संवेदनशील रसायन असून त्याचे चुकीचे हाताळणी अनेकांच्या जीवावर परिणाम करू शकते. दुसऱ्या दाव्यानुसार, दहशतवाद्यांनी आधीच IED कारमध्ये लावलेले होते, आणि स्फोटाचा टप्प्यात अमोनियम नायट्रेटही स्फोटला कारणीभूत ठरले. याच पार्श्वभूमीवर, एका दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी तपास करत आहेत आणि स्फोटाच्या कारणावर अंतिम निष्कर्ष लवकरच जाहीर करण्याची तयारी करत आहेत.

Comments
Add Comment