Friday, November 14, 2025

मोदींचा विरोधकांवर थेट हल्लाबोल, येत्या काळात काँग्रेसमध्ये पडू शकते फुट?

मोदींचा विरोधकांवर थेट हल्लाबोल, येत्या काळात काँग्रेसमध्ये पडू शकते फुट?

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने ८९ तर जेडीयूने ८५ जागांवर दणदणीत विजय मिळला. तर बिहारमधील २४३ जागांपैकी केवळ सहा जागांवर विरोधक काँग्रेसला मिळाल्याने त्यांचा दारूण पराभव झाला. त्यामुळे बिहारमध्ये आता एनडीएचे सरकार स्थापन होणार यात विरोधकांनाही तीळमात्र शंका नसावी. दरम्यान बिहारच्या निवडणूक निकालानंतर पंतप्रधानांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच, येणाऱ्या काळात काँग्रेसमध्ये मोठी फूट पडेल असे मोठे भाकीत देखील त्यांनी केले.

मोदींचे काँग्रेसबाबत मोठी भाकीत

मोदी आपल्या भाषणात म्हणाले, बिहारमध्ये भाजपने जितक्या जागा जिंकल्या, तितक्या जागा काँग्रेस गेल्या सहा राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मिळून जिंकू शकलेली नाही. काँग्रेसच्या राजकारणाचा आधार आता फक्त नकारात्मक राजकारण झाला आहे. कधी चौकीदार चोर है चा नारा, संसदेचा वेळ वाया घालवणे, प्रत्येक संस्थेवर हल्ला करणे, कधी ईव्हीएमवर प्रश्न, कधी निवडणूक आयोगाला शिवीगाळ, कधी मतचोरीचा आरोप, देशाच्या शत्रूंचा अजेंडा पुढे आणणं यामुळे काँग्रेसकडे देशासाठी कोणताही सकारात्मक दृष्टीकोन नाहीये. तसेच, आज काँग्रेस 'मुस्लीम लीगी माओवादी काँग्रेस' अर्थात एमएमसी बनली आहे. काँग्रेसचा संपूर्ण अजेंडा याच गोष्टींवर चालतो. त्यामुळेच काँग्रेसमध्येदेखील एक वेगळा प्रवाह तयार होतोय. जो या नकारात्मक धोरणाच्या विरोधी आहे. त्यामुळे कदाचित येत्या काळात काँग्रेसमध्ये फुट पडू शकते, अशी टीका मोदींनी केली आहे.

काँग्रेसच्या मित्र पक्षांनाही सावध राहा

काँग्रेसच्या मित्र पक्षांनाही कळतंय की काँग्रेस त्यांच्या निगेटिव्ह पॉलिटिक्समध्ये सर्वांना घेऊन डुबत आहे. त्यामुळेच मी बिहार निवडणुकीत सांगितले होते की, काँग्रेसचे नामदार तलावात डुबकी मारून बिहार निवडणुकीत स्वत डुबण्याची आणि इतरांना डुबवण्याचा सराव करत आहेत. मी आधीही या मंचावरून काँग्रेसच्या साथीदारांना सावधान केले होते. काँग्रेस ही परजीवी आहे. ते आपल्या सहकाऱ्यांची मत बँक घेऊन पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे काँग्रेसच्या मित्रपक्षांनी त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे, असा हल्लाबोल यावेळी नरेंद्र मोदी यांनी केला.

विकास विरोधी लोकांना जनतेने उत्तर दिले आहे

बिहारचा निकाल हा घराणेशाहीतल्या लोकांना जनतेने दिलेलं उत्तर आहे. भारताच्या विकासात बिहारच्या लोकांचा सिंहाचा वाटा आहे. पण ज्या लोकांनी सहा दशके देशाची सत्ता उपभोगली त्यांनी बिहारला बदनाम केले. बिहारच्या गौरवशाही इतिहासाचा सन्मान काँग्रेसने केला नाही. तसेच बिहारच्या लोकांच्या अपमान केला.

Comments
Add Comment