Saturday, November 15, 2025

भांडुपमध्ये मनसे गळाला लावणार तीन प्रभाग

भांडुपमध्ये मनसे गळाला लावणार तीन प्रभाग

खासदार कन्येला कुठल्या प्रभागात स्थान

भाजपाच्या गडात की मनसेच्या वाट्याला जाणाऱ्या प्रभागात

मुंबई (सचिन धानजी)

मुंबईतील ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील भांडुप विधानसभा क्षेत्र हे मनसे आणि उबाठा शिवसेनेचा गड मानला जात असला तरी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार अशोक पाटील यांनी विजय मिळवत हे अंदाज खाेटे ठरवले. त्यामुळे आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या वाट्याला सात पैंकी ३ प्रभाग जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनसेच्यावतीने प्रभाग ११३, प्रभाग ११४ आणि प्रभाग ११५ या मतदार संघांमध्ये दावा केला जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या विधानसभेत भाजपाची नगरसेविका असलेल्या प्रभाग ११२ मध्ये विद्यमान खासदार संजय पाटील यांच्या कन्येला निवडणूक रिंगणात उतरवतात की शिवसेनेचे उमेदवार माने आणि ज्यावर मनसेचा दावा आहे त्या प्रभाग क्रमांक ११५मधून उमेदवारी मिळवून घेतात याकडे भांडुपकरांचे लक्ष आहे.

भांडुप विधानसभेत भाजपाचा दोन नगरसेविका निवउून आल्या होत्या, तर चार प्रभागांमध्ये शिवसेनेचे नगरसेवक होते. त्यातील एक नगरसेवक शिवसेनेत गेले असून उर्वरीत तीन नगरसेवक हे उबाठाकडे आहेत. तर एक नगरसेविका काँग्रेसची आहे. त्यामुळे या विधानसभेत सात पैंकी तीन नगरसेवक हे शिवसेना आणि भाजपाकडे आहेत. तर चार नगरसेवक हे उबाठा आणि काँग्रेसचे आहेत. यातील प्रभाग क्रमांक १०९ हा मागील चार निवडणुकीत प्रथमच खुला झाला आहे. त्यामुळे या विधानसभेत एकमेव हा प्रभाग असल्याने विद्यमान नगरसेविका दिपाली गोसावी यांचा दावा असेला तरीमाजी आमदार रमेश कोरगावकर यांचे पुनर्वसन या प्रभागात होवू शकते. तर प्रभाग क्रमांक ११०हा चार निवडणुकीत तिसऱ्यांदा महिला आरक्षित आहे. या प्रभाग मागील चार ते पाच निवडणुकीत कोपकर कुटुंंबाकडेच राहिलेला आह. त्यामुळे कधी सुरेश कोपरकर तर कधी आशा कोपरकर या निवडून येत आहेत.

प्रभाग क्रमांक ११२ हा सलग दुसऱ्यांदा महिला आरक्षित झाला आहे. यापूर्वी हा प्रभाग ओबीसी आणि अनुसूचित जाती महिला यासाठी राखीव होता. याप्रभागांत विद्यमान नगरसेविका साक्षी दळवी यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता असून या मतदार संघात विद्यमान खासदार संजय पाटील हे आपली कन्या राजुल पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. हा प्रभाग पाटील यांच्यासाठी अनुकूल असला तरी याठिकाणी भाजपाची पक्के मतदार असल्याने पाटील याठिकाणी धोका पत्करणार नाही असेही बोलले जात आहे.

प्रभाग क्रमांक ११३ हा प्रभाग ओबीसी झाला असला तरी मागील निवडणुकीत तो महिला होता आणि त्याआधीच्या दोन निवडणुकीत हा प्रभाग खुला होता. पण विद्यमान नगरसेविका दीपमाला बढे या ओबीसी असल्याने त्यांचा पहिला दावा असेल. पण माजी आमदार रमेश कोरगावकर यांचाही दावा असेल. तर या प्रभागात विद्यमान आमदार अशोक पाटील हे आपल्या पुत्राला रुपेशला निवडणूक रिंगणात उतरवू शकतात,असे बोलले जात आहे. परंतु या प्रभागात मनसेचा दावा असेल असे बोलले जात आहे.

प्रभाग क्रमांक ११४हा प्रभाग महिला आरक्षित झाल्याने माजी आमदार व विद्यमान नगरसेवक रमेश कोरगावकर यांना दुसऱ्या प्रभागाचा शोध घ्यावा लागत आहे. या प्रभागावर मनसेचा पक्का दावा असेल. याठिकाणी मनसेकडून माजी नगरसेविका अनिषा माजगावकर यांची दावेदारी मानली जात आहे, तर शिवसेनेकडून सुप्रिय धुरत यांची इच्छुक उमेदवार म्हणून चर्चा आहे.

प्रभाग क्रमांक ११५हा महिला आरक्षित झाला आहे. सलग दोन वेळा हा मतदार संघ खुला झाला होता. पण आता महिला आरक्षित झाल्याने विद्यमान आणि उबाठातून शिवसेनेत गेलेल्या उमेश माने यांना आपल्या कन्येला निवडणूक रिंगणात उतरवावे लागणार आहे. तसेच शिवसेनेची स्नेहा पाटकर ही सुध्दा इच्छुक आहेत. तर हा प्रभाग मनसेला सोडला जाण्याची शक्यता असून याठिकाणी माजी नगरसेविका वैष्णवी सरफरे आणि ज्योती राजभोज यांच्या नावाची चर्चा आहे.

प्रभाग ११६ हा सलग दुसऱ्या महिला आरक्षित झाला आहे. यापूर्वी तो ओबीसी महिला आणि खुला प्रवर्ग झाला होता. या प्रभागात विद्यमान नगरसेविका जागृती पाटील यांना भाजपाकडून पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर उबाठाकडून विद्यमान शाखाप्रमुख उत्तेकर हे आपल्या पत्नीला निवडणूक रिंगणात उतरवू शकतात, तसेच काँग्रेसकडून प्रितम तुळसकर हेही आपल्या पत्नीला निवडणूक रिंगणात उतरवू शकतात अशी चर्चा आहे.

संभाव्य इच्छुक नगरसेवकांची यादी

प्रभाग १०९ (खुला)(दावा उबाठा, भाजपा)

उबाठा : दिपाली गोसावी, रमेश कोरगावकर, सुरेश शिंदे

प्रभाग ११० (महिला) (दावा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस)

काँग्रेस : आशा कोपरकर

मनसे : मोहन चिराथ

राष्ट्रवादी काँग्रेस : मनिषा तुपे

प्रभाग ११२ (महिला) (दावा भाजपा, उबाठा)

भाजपा : साक्षी दळवी

उबाठा : राजुल पाटील

प्रभाग ११३(ओबीसी) (दावा उबाठा, शिवसेना)

उबाठा : दीपमाला बढे, रमेश कोरगावकर

शिवसेना : रुपेश पाटील

प्रभाग ११४ (महिला)(दावा मनसे, शिवसेना)

मनसे : अनिषा माजगावकर

शिवसेना : सुप्रिया धुरत, शिंदे

प्रभाग ११५ (महिला) (दावा शिवसेना, मनसे)

शिवसेना : वैष्णवी माने, स्नेहा पाटकर

भाजपा : निकिता घाडिगावकर

मनसे : वैष्णवी सरफरे. ज्योती राजभोग

प्रभाग ११६ (महिला)(दावा भाजपा, उबाठा)

भाजपा : जागृती पाटील

उबाठा: उत्तेकर

काँग्रेस : तुळसकर

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >