धरती आबा भगवान बिरसा मुंडा हे अभिमानी आणि अदम्य भारतीय अस्मितेचे शाश्वत प्रतीक आहेत, ज्यांचे जीवन आपल्याला आठवण करून देते की जोपर्यंत समाज त्याच्या संस्कृतीत रुजलेला असतो तोपर्यंत संघर्षाची ज्योत कायम राहते. त्यांचा प्रवास सत्य, स्वाभिमान आणि दृढनिश्चयाच्या क्षमतेची आठवण करून देतो, तसेच दाखवून देतो की, सामान्य व्यक्ती देखील असाधारण गोष्टी साध्य करू शकतात आणि इतिहास घडवू शकतात. त्यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त, आपण भारतातील प्रत्येक आदिवासी समुदायाला सन्मान, शिक्षण, संधी आणि स्वाभिमानाने समृद्ध करण्याची प्रतिज्ञा करूया. शेवटी, समाजातील प्रत्येक सदस्य देशाच्या प्रगतीत सहभागी होईल तेव्हाच खरा विकास होईल. 'धरती आबा' भगवान बिरसा मुंडा यांना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. जय जोहर!
अनादी काळापासून, भारतीय संस्कृती वसुधैव कुटुंबकम या मार्गदर्शनात्मक भावनेखाली भरभराटीला आली आहे, याचा अर्थ असा की संपूर्ण जग 'एक कुटुंब' आहे. या भूमीचे वैभव फक्त विस्तीर्ण साम्राज्यांपुरते मर्यादित नाही, तर विशाल आणि बहुआयामी समुदायांमध्ये आहे, ज्यांनी अंतर्ज्ञानाने स्वत:चे जीवन घडवले आहे, निसर्ग आणि श्रद्धेशी परोपकारी सुसंवाद साधला आहे. यापैकी, आदिवासी समाज भारतीय पैलूच्या सर्वात प्राचीन आणि हृदयस्पर्शी अभिव्यक्तीला सादर करतो, जेथे भूमातेबद्दल अतूट श्रद्धा आणि स्वाभिमानाचा शोध अखंडपणे एकत्रित दिसून येतो. भारतात असलेल्या आदिवासी समाजामध्ये 'धरती आबा' भगवान बिरसा मुंडा यांनी चमकदार कामगिरी केली आहे. भारतातील आदिवासी समाजाच्या उत्साहाला पुन्हा जागृत करत त्यांचे नाव आज आदिवासी अस्मिता, प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्याच्या संघर्षाचे तेजस्वी प्रतीक म्हणून ओळखले जाते. बिरसा मुंडा यांची १५०वी जयंती त्यांच्या श्रद्धा, स्मृती आणि देशासाठी अमर्याद संकल्पाचा भव्य उत्सव आहे. १५ नोव्हेंबर १८७५ रोजी सध्याच्या झारखंडमधील उलिहाटू गावात जन्मलेले भगवान बिरसा मुंडा हे एका सामान्य शेतकरी कुटुंबातले होते. तरीही त्यांची दृष्टी आणि बुद्धिमत्ता असाधारण होती. लहानपणापासून त्यांनी नेतृत्व, शिक्षण आणि चिंतन यांचे दुर्मीळ संयोजन दाखवले. जर्मन मिशनरी शाळेत शिक्षण घेण्यासह त्यांनी ब्रिटिश शासक आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या धोरणांचे बारकाईने निरीक्षण केले, त्यांना माहीत होते की त्यांचे नियंत्रण फक्त या भूमीवर नाही तर लोकांच्या गुलामगिरीच्या भावनेवर देखील पसरलेले आहे. या अंतर्दृष्टीने त्यांच्यात जागृतीचे प्राथमिक बीज पेरले आणि अखेर ते परिपूर्ण व देवासारखे नेते, सुधारक आणि जनतेसाठी आध्यात्मिक मार्गदर्शक बनले.
'धरती आबा' भगवान बिरसा मुंडा यांनी मातृभूमी आणि महत्त्वपूर्ण संसाधन जसे जमीन, पाणी व जंगल यांचे रक्षण करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांनी परकीय वर्चस्वाविरुद्ध लढा देण्यासोबत त्याच धैर्याने अन्याय, शोषण आणि सामाजिक असमानतेविरोधात देखील लढा दिला. भूसंपादनाच्या बहाण्याने ब्रिटिशांनी आदिवासी समुदायाच्या वडिलोपार्जित जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना त्यांच्याच मातृभूमीत एकटे सोडले. या महत्त्वाच्या टप्प्यावर, बिरसा मुंडा यांनी घोषणा केली, ''ही पृथ्वी आमची माता आहे; ती कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.'' या जोरदार आवाहनासह, १८९९ मध्ये महान जनक्रांती उलगुलन सुरू झाली, तसेच स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची घोषणा झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंडा योद्ध्यांनी सिंहभूम, खुंटी, तामार, सरवारा आणि बंदगावमध्ये ब्रिटिश राजवटीला आव्हान दिले. त्यांचे आयुष्य फक्त २५ वर्षांचे असताना देखील त्यांचे धैर्य, दूरदृष्टी आणि नेतृत्वाने इतिहासावर अमिट छाप सोडली आणि पिढ्यांना प्रेरणा देत राहिले. बिरसा मुंडा यांचा संघर्ष धर्म, संस्कृती आणि सामाजिक सुधारणांच्या जाणिवेत खोलवर रुजलेला होता. त्यांनी अधीनता फक्त राजकीय नाही तर मानसिक देखील आहे, यावर भर दिला. त्यांनी आदिवासी समाजाला अंधश्रद्धा, ढोंगीपणा, व्यसन आणि सामाजिक विभाजन नाकारण्याचे आवाहन केले, तसेच आध्यात्मिक तत्त्वामध्ये श्रम, सत्य आणि स्वाभिमानाला महत्त्व दिले. त्यांच्यासाठी निसर्ग पवित्र होते; पृथ्वी, पाणी, जंगल आणि पर्वत हे श्रद्धेच्या पवित्र वस्तू होत्या. त्यांनी आधीच इशारा दिला होता की आपल्या भूमीपासून दूर जाणारा समाज अस्तित्वात नाहीसा होतो, हा संदेश पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या युगात आजही शक्तिशालीपणे दिसून येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतात १५ नोव्हेंबर हा दिवस आदिवासी गौरव दिन म्हणून घोषित केला तेव्हा हा सन्मान या महान नायकाला मानवदंनेपेक्षा अधिक होता, ते विसरलेल्या इतिहासाला आवश्यक नवसंजीवनी होते, जे देशभावनेला बळकटी देते. हा सन्मान असंख्य आदिवासी प्रमुखांना सन्मानित करतो, ज्यांनी जंगल, पर्वत आणि सीमावर्ती प्रदेशांमध्ये आव्हानात्मक स्थितीत राहून देखील स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाची ज्योत त्यांच्या हृदयात जिवंत ठेवली. २०२५ ला आदिवासी गौरव वर्ष म्हणून घोषित केल्याने हा दूरदर्शी दृष्टिकोन पुढे चालू राहिले, असा दृष्टिकोन, ज्यामध्ये विकास फक्त आर्थिक वाढीमधून नाही तर सांस्कृतिक पुनर्जागरण, प्रतिष्ठा आणि स्वाभिमानाच्या साजरीकरणामधून दिसून येतो.
उत्तर प्रदेशची भूमी आदिवासी परंपरांच्या समृद्ध वारशाची उत्साही प्रतीक आहे. थारू, गोंड, कोल, भुइंया, चेरो, खरवार आणि वंतंगिया यांसारखे समुदाय राज्याच्या सांस्कृतिक रचनेत खोलवर रुजलेले आहेत. या समुदायांचे श्रम, लोककला आणि जीवनशैलीमधून 'धरती आबा' यांचा कालातीत उत्साह, निसर्गावरील प्रेम, श्रमाबद्दल आदर आणि मातृभूमीवरील भक्तीची कालातीत भावना दिसून येते. राज्य सरकारने आदिवासी समुदायांच्या कल्याण आणि विकासाला चालना देण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. सोनभद्र, मिर्झापूर, लखीमपूर खेरी आणि बलरामपूर या जिल्ह्यांमध्ये सरकारी आश्रम शाळा स्थापन करण्यात आल्या आहेत. बलरामपूरमधील इम्लिया कोडेर येथील थारू आदिवासी संग्रहालय त्यांच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन आणि प्रशंसित करते. प्रयागराज महाकुंभ २०२५ मध्ये आदिवासी प्रदर्शनासारख्या व्यासपीठांनी या समुदायांना ओळख आणि आवाज दिला आहे. गोरखपूर, महाराजगंज आणि जवळच्या भागातील वंतांगीया समुदायाच्या पुनर्वसनापासून पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, आरोग्यसेवा आणि घरांच्या तरतुदीपर्यंत प्रत्येक आदिवासी भागात विकास झाला आहे. स्वातंत्र्यानंतर सात दशकांहून अधिक काळ आपली ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करावा लागलेल्या वंतांगीया समुदायाला आता महसुली गाव, मतदानाचा अधिकार, स्वतंत्र ओळख आणि स्वावलंबनाचे साधन म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या परिवर्तनामधून अंत्योदयाची खरी भावना दिसून येते, जे तळागाळातील व्यक्तींना प्रगती करण्यास प्रेरित करते. भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनामधून शिकवण मिळते की, खरे स्वराज्य म्हणजे फक्त राजकीय बदल नाही तर समाजाच्या आत्मविश्वासाचे सक्षमीकरण आहे. त्यांनी दाखवून दिले की, लोक त्यांच्या मूल्यांशी, परंपरांशी आणि संस्कृतीशी जोडलेले असतात तेव्हा देश अधिक सामर्थ्यवान बनतो. त्याच तत्त्वानुसार, उत्तर प्रदेश सरकार प्रत्येक व्यक्तीसाठी आदर, प्रत्येक समुदायासाठी संधी आणि प्रत्येक प्रदेशासाठी समृद्धी सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करते. सर्वोदयाकडे घेऊन जाणाऱ्या अंत्योदयाच्या या दृष्टिकोनामधून 'धरती आबा' यांच्या जीवनाचा अनुभव मिळतो आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास' या आवाहनामधून ते दिसून येते.
- योगी आदित्यनाथ,मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश






