स्मार्टफोनची किंमत फक्त ७२९९ रूपये तेही १२८ जीबी स्टोरेजसह बाजारात उपलब्ध
मुंबई:आयटेलने नुकतेच लाँच करण्यात आलेल्या ए९० लिमिटेड एडिशनमधील अपग्रेड ए९० लिमिटेड एडिशनच्या १२८ जीबी व्हेरिएण्टच्या लाँचची घोषणा केली आहे. नव्या स्मार्टफोनमध्ये ९० लिमिटेड एडिशन १२८ जीबी व्हेरिएण्टमध्ये अधिक स्टोरेज, आकर्षक डिझाइन व मिलिटरी-ग्रेड डिस्प्ले सिक्युरिटी दिली गेली असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे .
या मिलिटरी ग्रेड डिस्प्ले सिक्युरिटीसह, टिकाऊपणा हे आवश्यक फिचर्स म्हणून अत्यावश्यक असताना, 'डिवाईस आयटेलच्या ३पी वचनासह येतो जेथे धूळ, पाणी आणि नकळतपणे जमिनीवर पडल्यामुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण देतो. ए९० स्मार्टफोन आयपी५४ प्रमाणित संरक्षणासह डिझाइन करण्यात आला आहे, ज्यामुळे पाणी, धूळ आणि नकळतपणे खाली पडल्यामुळे होणाऱ्या नुकसानापासून अधिक संरक्षण मिळते. किंमत फक्त ७२९९ रूपये असलेला हा डिवाईस भारतभरातील रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे. या डिवाईससोबत १०० दिवसांच्या आत मोफत स्क्रिन रिप्लेसमेंट सेवा देखील मिळते, ज्यामधून भारतात फक्त आयटेलकडून दिल्या जाणाऱ्या अद्वितीय विश्वसनीयतेची खात्री मिळते.' असे कंपनीने नेमक्या शब्दात म्हटले आहे.
या अपग्रेडमध्ये काय नवीन फिचर ?
१२८ जीबी स्टोरेज, ज्यामुळे वापरकर्ते स्टोरेज क्षमतेबाबत चिंता न करता दैनंदिन क्षणांना कॅप्चर व सेव्ह करू शकतात. १२ जीबी (४ जीबी + ८ जीबी*) रॅम असलेला हा डिवाईस सोशल मीडियामध्ये बदल करायचा असो मनोरंजनाचा आनंद घ्यायचा असो किंवा चालता-फिरता कामाची हाताळणी करायची असो सुलभ मल्टीटास्किंग शक्य
डिझाइनसंदर्भात ए९० लिमिटेड एडिशन १२८ जीबी व्हेरिएण्टमध्ये मॅक्स डिझाइन कायम ठेवण्यात आल्याचे कंपनीने निवेदनात स्पष्ट केल आहे.
स्मार्टफोन एमआयएल-एसटीडी-८१०एच मिलिटरी-ग्रेड प्रमाणन आणि आयपी५४ रेटिंगसह डिझाइन धूळरोधक, जलरोधक असण्यासोबत नकळतपणे जमिनीवर पडल्यामुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण देणार
आयटेल ए९० लिमिटेड एडिशनचे प्रमुख वैशिष्ट्ये -
६.६-इंच ९० हर्टझ एचडी+ डिस्प्ले आणि डीटीएस साऊंड टेक्नोलॉजी, जे आकर्षक रंगसंगती, सुस्पष्टता व आकर्षक व्हिज्युअल्ससह उत्साहपूर्ण अनुभव देण्यासाठी डिझाइन
ऑल्वेज-ऑन डिस्प्ले आणि सर्वोत्तम डायनॅमिक बार वापरकर्त्यांना विनाव्यत्यय बॅटरी स्थिती दिसणार
कॉल्स, नोटिफिकेशन्स अशा महत्त्वपूर्ण घटकांसह कनेक्टेड राहण्याची खात्री
फोटोग्राफीप्रेमी १३ मेगापिक्सल रिअर कॅमेराचा आनंद घेऊ शकतील. प्रगत इमेज प्रोसेसिंग आणि नवीन स्लाइडिंग झूम बटन आहे, ज्यामुळे उत्साहपूर्ण क्षण सहजपणे कॅप्चर करता येऊ शकतात.
नवीन स्लाइडिंग झूम बटन त्वरित एका हाताने झूम करण्याची आणि त्वरित स्नॅपशॉट्स कॅप्चर करण्याची सुविधा ज्यामुळे परिपूर्ण फोटोज कधीच न चुकण्याची खात्री
इतर फिचर-
आयटेलचे एआय वॉईस असिस्टण्ट आणि डायनॅमिक बार नेव्हिगेशन व मल्टीटास्किंग सोपे करतात, तर डीटीएस साऊंड तंत्रज्ञान ऑडियोसह उपलब्ध






