Saturday, November 15, 2025

कोलकाता कसोटी तीन दिवसांत संपणार ?

कोलकाता कसोटी तीन दिवसांत संपणार ?
कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना ईडन गार्डन्स स्टेडियम येथे खेळवला जात आहे. हा सामना तीन दिवसांत संपण्याची शक्यता आहे. कोलकाता येथे सुरू असलेला कसोटी सामना शुक्रवार १४ नोव्हेंबर रोजी सुरू झाला. अवघ्या दोन दिवसांत २६ फलंदाज बाद झाले. यामुळे सामना रविवार १६ नोव्हेंबर रोजी म्हणजेच तिसऱ्या दिवशी संपण्याची शक्यता आहे. नाणेफेक जिंकून कोलकाता कसोटीत फलंदाजीचा निर्णय दक्षिण आफ्रिकेने घेतला. त्यांचा पहिला डाव १५९ धावांत आटोपला. यानंतर मैदानावर आलेल्या भारताने नऊ बाद १८९ धावा केल्या. शुभमन गिल फलंदाजी करत असताना मानेचे स्नायू दुखावल्यामुळे निवृत्त झाला. भारताचा पहिला डाव १८९ धावांत आटोपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची पुन्हा एकदा दाणादाण उडाली. फक्त ९३ धावांत दक्षिण आफ्रिकेचे सात फलंदाज बाद झाले. दक्षिण आफ्रिकेने ६३ धावांची आघाडी घेतली असली तरी कर्णधार बावुमा वगळता त्यांच्याकडे उर्वरित तळाचे फलंदाज आहे. सध्याची स्थिती बघता कोलकाता कसोटी लवकर संपण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment