Saturday, November 15, 2025

Maithili Thakur Win Bihar Election 2025 : वय फक्त २५… अन् ११ हजारांच्या आघाडीने विक्रमी विजय; बिहारला मिळाली सर्वात तरुण आमदार! काय म्हणाली मैथिली?

Maithili Thakur Win Bihar Election 2025 : वय फक्त २५… अन् ११ हजारांच्या आघाडीने विक्रमी विजय; बिहारला मिळाली सर्वात तरुण आमदार! काय म्हणाली मैथिली?

पटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत २०२५ (Bihar Election Result 2025) मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) एकतर्फी वर्चस्व प्रस्थापित करत मोठा विजय मिळवला आहे. एकूण २४३ जागांपैकी तब्बल २०२ जागांवर एनडीएने बाजी मारत स्पष्ट बहुमत मिळवलं, ज्यात भाजप, जेडीयू आणि लोजप या पक्षांचा निर्णायक वाटा आहे. भाजपला ८९, जेडीयूला ८५, तर लोजपला देखील महत्त्वाची यश मिळाली आहेत. विरोधी आघाडीला मात्र अपेक्षित कामगिरी करता आली नाही. काँग्रेसला केवळ ६ जागा मिळाल्या, तर राजदला २५ जागांवर समाधान मानावे लागले. या निकालानंतर आता राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार यावर राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर अलीनगर मतदारसंघातील लढत विशेष चर्चेत राहिली. येथे भाजपच्या तरुण उमेदवार मैथिली ठाकूर (Maithili Thakur Win Or Not) यांनी आरजेडीचे उमेदवार विनोद मिश्रा यांचा ११ हजार मतांच्या फरकाने पराभव केला. ठाकूर यांना एकूण ८४,९१५ मतं मिळाली, तर मिश्रा यांना ७३,११५ मतांवर समाधान मानावं लागलं.फक्त २५ वर्षांच्या वयात विजय नोंदवत मैथिली ठाकूर यांनी बिहार विधानसभेतील सर्वात तरुण आमदार म्हणून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. अलीनगर मतदारांनी दिलेल्या प्रचंड समर्थनामुळे या विजयाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

विजयानंतर मैथिली ठाकूर भावुक

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

बिहार निवडणुकीत अलीनगरमधून विजयी झाल्यानंतर मैथिली ठाकूर यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. विजयाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की हा निकाल त्यांच्या वैयक्तिक यशाचा नाही, तर अलीनगरमधील प्रत्येक घराच्या विश्वासाचा आणि प्रेमाचा परिणाम आहे. आपल्या मतदारांना संबोधित करताना त्या म्हणाल्या की, “आज हा विजय माझा नसून, अलीनगरचा आहे. तुम्ही दिलेल्या अफाट प्रेमामुळे, विश्वासामुळे आणि आशीर्वादांमुळे मी केवळ प्रतिनिधी म्हणून नव्हे, तर तुमची मुलगी म्हणून इथे उभी आहे.” त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आणि निवडणूक मोहिमेत मेहनत घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले. ठाकूर म्हणाल्या की, “या संपूर्ण प्रवासात बूथपासून ते शीर्ष नेतृत्वापर्यंत काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यामुळेच हा संदेश प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचू शकला.” विजयानंतरच्या भावना व्यक्त करताना त्यांनी यावरही भर दिला की, हा विजय त्यांच्या वैयक्तिक महत्वाकांक्षेचा नसून, जनतेने ठेवलेल्या विश्वासाचा विजय आहे. “तुमचे प्रेम हीच माझी सर्वात मोठी ताकद आहे,” असे त्या म्हणाल्या. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मार्गदर्शनाबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. “त्यांची प्रेरणा आणि पाठबळामुळे आमच्या संपूर्ण टीमला उर्जा आणि दिशा मिळाली,” असे ठाकूर यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर कठोर टीका केली. बिहारमधील राजकीय घडामोडींवर बोलताना त्यांनी असा आरोप केला की काँग्रेस पक्ष आज देशासाठी कोणताही सकारात्मक दृष्टीकोन मांडण्यात अपयशी ठरत आहे. मोदींनी पुढे असेही सुचवले की, आगामी काळात काँग्रेसमध्ये विभाजनाची शक्यता निर्माण होऊ शकते, कारण पक्षाच्या नेतृत्वात स्पष्टता आणि दिशा नसल्याचे त्यांनी म्हटले. त्यांनी काँग्रेसच्या सध्याच्या राजकीय भूमिकेवर टीका करत म्हणाले की, “आज काँग्रेस मुस्लीम लीगी, माओवादी विचारसरणीच्या प्रभावाखाली गेलेली दिसते,” असे वक्तव्य त्यांनी बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केले. पंतप्रधानांच्या या विधानामुळे काँग्रेसच्या भवितव्यावर आणि राष्ट्रीय राजकारणातील तिच्या भूमिकेवर नवे चर्चाविषय निर्माण झाले आहेत.

Comments
Add Comment