Saturday, November 15, 2025

बिहार निवडणूक पराभवाचा फटका: रोहिणी आचार्यने RJD आणि कुटुंबाचा त्याग केला

बिहार निवडणूक पराभवाचा फटका: रोहिणी आचार्यने RJD आणि कुटुंबाचा त्याग केला

मुंबई : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत RJD च्या मोठ्या पराभवानंतर लालू प्रसाद यादवांच्या कुटुंबात तणाव वाढला आहे. या घडीला, लालू यांची कन्या आणि तेजस्वी यादवची बहिण असलेलय रोहिणी आचार्यने राजकारण पूर्णपणे सोडत असल्याची आणि कुटुंबीयांपासून वेगळे होण्याची घोषणा केली आहे.

रोहिणी आचार्य यांनी ट्विटरवर (X) लिहिले, “मी राजकारणातून बाहेर पडत आहे आणि माझ्या कुटुंबीयांशी सर्व संबंधदेखील तोडत करत आहे. संजय यादव आणि रमीझ यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची पूर्ण जबाबदारी मी घेत आहे.”

व्यवसायाने डॉक्टर असलेल्या रोहिणीने काही वर्षांपूर्वी वडिलांना किडनी दान केली होती तेव्हा ती खूप चर्चेत आली होती. त्यांनी मागील वर्षी सारण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, पण भाजपाचे राजीव प्रताप रुडी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.

या निवडणूक निकालानंतर RJD मध्ये अंतर्गत मतभेद स्पष्ट झाले आहेत. हा पक्षासाठी मोठा धक्का आहे. महाआघाडीच्या ६६ यादव उमेदवारांपैकी फक्त १२ जण विजयी झाले, तर एनडीएकडून २३ यादव उमेदवारांपैकी १५ जण निर्वाचित झाले. याचा अर्थ असा की यादव समाजाचा मोठा हिस्सा RJD ऐवजी NDA कडे वळला आहे.

रोहिणी आचार्यचा निर्णय हा केवळ राजकीय नसून कौटुंबिक स्तरावरही धक्कादायक ठरला आहे. वडील लालू प्रसाद यादवांसोबत तीचे नाते खूप घनिष्ट आहे; किडनी दान हे त्याचं स्पष्ट उदाहरण आहे.

रोहिणी आचार्यने स्पष्ट केले आहे की, “माझ्या राजकीय महत्वाकांक्षा किंवा कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. माझा आत्मसन्मान माझ्यासाठी सर्वोच्च आहे.”

मागील काही वर्षांत देखील तेज प्रताप यादव आणि आता रोहिणी आचार्य यांनी कुटुंबापासून अंतर ठेवले असून, यादव कुटुंबातील राजकीय आणि कौटुंबिक तणाव आता बाहेर येत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >