पुणे: अल कायदा या जागतिक दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याच्या संशयातून पुण्याच्या एटीएसने जुबेर हंगरगेकर याला ताब्यात घेतले होते. पुणे पोलीसांचा हा संशय आता खरा ठरला आहे. कारण जुबेरच्या लॅपटॉपमध्ये आक्षेपार्ह फाईल्स आढळल्या आहे. विशेष म्हणजे त्याच्या लॅपटॉपमध्ये १ टीबी पेक्षा अधिक डेटा असल्याची माहिती समोर आली आहे. या फाईल्सबाबत सखोल तपास सुरू आहे.
न्यायालयाने अल कायदा या जागतिक दहशतवादी संघटनेसाठी काम करत असलेल्या जुबेरची रवानगी विशेष न्यायालयीन कोठडीत केली आहे. अल कायदा इन इंडियन सबकाँटिनेन्ट (एक्यूआयएस) या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ जिहादचा प्रसार-प्रचार करून देशाच्या एकता व सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याच्या आरोपावरून जुबेर हंगरगेकर याला अटक करण्यात आली होती.
बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने ८९ तर जेडीयूने ८५ जागांवर आघाडी घेतल्याने एनडीएचा दणदणीत विजय झाला. जेडीयूपेक्षा ४ जागा अधिक मिळवल्याने ...
दरम्यान जुबेर हंगरगेकरला अटक केल्यानंतर त्याच्या काही साथीदारांनी संशयित पुस्तकं, प्रमाणपत्र आणि कागदपत्र गोळा करून जाळली होती. काळेपडळ परिसरातील मदरशाच्या मोकळ्या जागेत ही कागदपत्र जाळण्याचे तपासात समोर आले होते. महत्त्वाचे म्हणजे जुबेरच्या संपर्कात पाच परदेशातील व्यक्तींचे नंबर आहेत.






