मुंबई : नवी मुंबईतील भेळवाला सागर गोरडे याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सागरने नुकतेच शिवतीर्थवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना स्वतः बनवलेली भेळ खाऊ घातली. अनेक वर्षांपासून असलेलं त्याचं स्वप्न अखेर पूर्ण झाल्याचा आनंद त्याने व्यक्त केला.
राज ठाकरेंच्या घरी भेळवाला कसा पोहोचला?
सागर नेमका शिवतीर्थवर कसा पोहोचला याबाबत अनेकांना कुतूहल होतं. यावर शर्मिला ठाकरे यांनी सांगितलं की त्यांच्या मैत्रीण वंदना गुप्ते यांनी सहा वर्षांपूर्वी त्यांना सागरची भेळ चाखण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा ती भेळ खाल्ली आणि तिच्या चवीची दादही दिली.
त्याच आठवणींमुळे आणि भेळीच्या चवीमुळे सागरला थेट घरी बोलावण्यात आलं. मी तुम्हाला आमच्या घरी एखाद्या कर्यक्रमासाठी नक्की बोलवेन, तेव्हा नक्की या असं शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं.. राज ठाकरे यांनी देखील भेळीचं खास कौतुक करत चवदार असल्याचं सांगितलं. त्यामुळे सागरचा आनंद द्विगुणित झाला.
https://www.instagram.com/reel/DQ9BTarCOxO/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==सागरची भावना
इन्स्टाग्रामवर भावना व्यक्त करत सागर गोरडे म्हणाले सागर यांनी काय म्हटलं
सागर गोरडे यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हटलं की, "ग्रेट भेट राजसाहेब ठाकरे, जेव्हा मी हा १० वर्षांपूर्वी भेळचा छोटासा व्यवसाय चालू केला तेव्हा मनात विचार आला की मी बनवलेली ओली मटकी भेळ, सुकी मटकी भेळ राजसाहेब ठाकरे यांना देऊ शकतो का असा विचार केला?. तो विचार आज पूर्ण झाला. खरच आज शिवतीर्थ या निवास्थानी राजसाहेबाना आणि वाहिनीसाहेबांना भेटून अविस्मरणीय अनुभव आला. राजसाहेब आणि वाहिनीसाहेब व संपूर्ण परिवाराने ओली मटकी भेळ अशा दोन्ही प्रकारच्या भेळ खाऊन मनसोक्त भेळीचा आस्वाद घेतला.






