महत्वाच्या पदांवर अनुभवी नेतृत्व; विविध समाजघटकांसाठी स्वतंत्र संपर्क प्रमुख
केशव उपाध्ये, नवनाथ बन यांच्यावर ‘आरोप पत्र प्रमुख’ आणि ‘मीडिया संपर्क’ची दुहेरी जबाबदारी
मुंबई : भारतीय जनता पार्टी–महाराष्ट्रने आगामी महापालिका, नगर परिषद, नगर पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक २०२५ साठी महत्त्वाची प्रदेश संचालन समिती जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीने जारी झालेल्या या यादीत २३ पदांसाठी जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.
समन्वयक म्हणून माधवी नाईक यांची नियुक्ती करण्यात आली असून, सहसमन्वयक म्हणून विक्रांत पाटील यांची निवड झाली आहे. जाहिरनामा प्रमुख म्हणून विश्वास पाटील यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
निवडणूक कार्यक्रम, प्रचार, महिला, युवा, सामाजिक, सहकार, कृषी अशा सर्व विभागांसाठी स्वतंत्र प्रमुख नेमण्यात आले आहेत. विविध समाजघटकांपर्यंत पोहोचण्यासाठी ही समिती महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास भाजपने व्यक्त केला आहे.
निवडणूक साहित्य, वितरण, मीडिया आय.टी., कारभार, कार्यालयीन समन्वय यांसाठी देखील अनुभवी कार्यकर्त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
भाजपने घोषणा केलेली ही समिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत पक्षाची रणनीती मजबूत करण्यासाठी निर्णायक मानली जात आहे.






