ओडिसा: सुप्रसिद्ध भारतीय गायिका श्रेया घोषालचा ओडिसा कटक येथे १३ नोव्हेंबरला लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित केला होता. ओडीसातील बाली यात्रा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमानिमित्ताने श्रेयाचा कॉन्सर्ट पाहण्यासाठी अनेक चाहत्यांनी गर्दी केली होती. यावेळी श्रेयाने डोला रे डोला, चिकनी चमेली, मस्तानी हो गई आणि मनवा लागे सारख्या तिच्या सुरेल गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. मात्र यावेळी एक दुर्घटना घडली आणि संपूर्ण यात्रेला गालबोट लागले.
श्रेयाचा लाईव्ह कॉन्सर्ट पाहण्यासाठी बाली यात्रेत मर्यादेच्या बाहेर गर्दी जमा झाली होती. यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली आणि या दुर्घटनेत काहीजण जखमी झाले. कटकच्या जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांनी सांगितलं की, श्रेया घोषाल परफॉर्म करण्यासाठी स्टेजवर आली तेव्हा कॉन्सर्टला आलेला जमाव स्टेजवर धावला आणि गोंधळ निर्माण झाला. यामुळे श्रेयाचा कॉन्सर्ट काही वेळासाठी थांबवावा लागला. मात्र काही वेळातच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि कॉन्सर्ट पुन्हा सुरू झाला. श्रेया घोषालची कटकमध्ये सादरीकरण करण्याची ही पहिलीच वेळ होती.
कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची मालिका आयोजित करण्यात आली आहे. या मालिकेचा पहिला सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवला ...
दरम्यान, श्रेया घोषाल सध्या 'इंडियन आयडॉल' या कार्यक्रमाचे परीक्षण करत असून तिच्यासोबत या शोमध्ये विशाल दादलानी आणि बादशाहसुद्धा आहेत.