Thursday, November 13, 2025

Bihar Election Result : बिहारमध्ये एनडीएची सत्ता येणार, आतापर्यंतचे कल पाहून महागठबंधन चिंतेत

Bihar Election Result : बिहारमध्ये एनडीएची सत्ता येणार, आतापर्यंतचे कल पाहून महागठबंधन चिंतेत
पाटणा : बिहारमध्ये विधानसभेच्या २४३ जागांसाठी ६ आणि ११ नोव्हेंबर असे दोन टप्प्यात मतदान झाले. आता मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेले कल बघता एनडीएला बहुमत मिळाल्याचे दिसत आहे. बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएची सत्ता येत असल्याचे बघून महागठबंधन चिंतेत आहे. आतापर्यंत आलेल्या कलानुसार बिहारमध्ये एनडीए १६५, महागठबंधन ७३, जनसुराज पार्टी ३ आणि इतर २ जागांवर आघाडीवर आहेत. बिहारमध्ये बहुमताचा जादुई आकडा १२२ आहे. एनडीएने तर १५० चा टप्पा ओलांडला आहे. यामुळे एनडीएची स्थिती भक्कम आहे.   बिहारमध्ये ७४.२ दशलक्ष नोंदणीकृत मतदार आहेत. यात ३९.२ दशलक्ष पुरुष आणि ३५ दशलक्ष महिला आहेत. विधानसभेसाठी बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात ६५.०८ टक्के आणि दुसऱ्या टप्प्यात ६८.७६ टक्के मतदान झाले.

विविध एक्झिट पोल्सनी राज्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) 'क्लीन स्वीप' करणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. सर्व प्रमुख एक्झिट पोल्सनी नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला स्पष्ट बहुमत मिळेल, असे भाकीत केले आहे. पीपल्स इनसाइट (People's Insight), पीपल्स पल्स (People's Pulse), मॅट्रिझ (Matrize), दैनिक भास्कर (Dainik Bhaskar), पीएमआरक्यू (PMRQ) आणि जेव्हीसी पोल्स (JVC's Polls) या सहा एक्झिट पोल्सनी एनडीएला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज दिला आहे. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील 'महागठबंधन'ला मात्र मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या एक्झिट पोल्सनुसार, 'महागठबंधन' ७० ते १०२ जागांच्या दरम्यान अडकण्याची शक्यता आहे. पाच वर्षांपूर्वी राष्ट्रीय जनता दलाने एकट्याने ७५ जागा जिंकल्या होत्या आणि त्यांचे आघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या अगदी जवळ पोहोचले होते. त्या तुलनेत यंदा 'महागठबंधन'ची पीछेहाट होण्याची शक्यता आहे. प्रशांत किशोर यांची जनसुराज पार्टी यंदाच्या निवडणुकीत विशेष प्रभाव पाडणार नाही असे चित्र आहे.

विविध एक्झिट पोल्सनुसार एनडीएला मिळणाऱ्या जागांचा अंदाज :

  • पीपल्स इनसाइट (People's Insight): १३३-१४८ जागा

  • पीपल्स पल्स (People's Pulse): १३३-१५९ जागा

  • मॅट्रिझ (Matrize): १४७-१६७ जागा

  • दैनिक भास्कर (Dainik Bhaskar): १४५-१६० जागा

  • जेव्हीसी पोल्स (JVC's Polls): १३५-१५० जागा

एक्झिट पोलचा तपशील (Seats)

एक्झिट पोल

NDA

महागठबंधन 

जनसुराज 

इतर 

पीपल्स इनसाइट

१३३-१४८

८७-१०२

०-२

३-६

मॅट्रिझ

१४७-१६७

७०-८०

०-२

२-८

दैनिक भास्कर

१४५-१६०

७३-९१

०-०

५-१०

पीपल्स पल्स

१३३-१५९

७५-१०१

०-५

२-८

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >