Thursday, November 13, 2025

मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसह जवानांना पूरपरिस्थितीत बचावाचे प्रशिक्षण, ऍडवॉन्स फ्लड आणि रेस्क्यू प्रशिक्षणाकरता नेमली संस्था

मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसह जवानांना पूरपरिस्थितीत बचावाचे प्रशिक्षण, ऍडवॉन्स फ्लड आणि रेस्क्यू प्रशिक्षणाकरता नेमली संस्था

पाण्यात आणि उंचावर अडकलेल्यांना अत्याधुनिक पध्दतीने वाचवण्यासाठी करणार प्रशिक्षित

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई अग्निशमन दलाच्या जवान आणि अधिकाऱ्यांना आता ऍडवॉन्स फ्लड आणि रेस्क्यूचे ट्रेनिंग दिले जाणार आहे. मुंबईत मोठ्याप्रमाणात पाऊस पडल्यास निर्माण होणा-या पुर सदृश्यस्थितीमध्ये नागरीकांचे प्राण वाचविण्याचे काम अग्निशमन दलामार्फत केले जाते. त्यामुळे पावसाळ्यातील पुरसदृश्य परिस्थिीमध्ये अत्यंत प्रभावी सेवा देण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकारी व जवानांना याप्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.अशाप्रकारचे प्रशिक्षण यापूर्वी २०१९मध्ये देण्यात आले होते, परंतु यातील बहुतांशी अधिकारी सेवानिवृत्त झाल्याने पुढील तीन वर्षांकरता हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकारी, जवानांना पुरसदृश्य परिस्थिती तलाव तथा समुद्रात अथवा पाण्यामध्ये बुडणा-या व्यक्तीला वाचविण्याकरिता पाचारण करण्यात येते. मुंबईत आगीसारख्या दुघर्टना घडल्यास या दलाच्या माध्यमातून आग विझवण्याचे अथवा यामध्ये अडकलेल्या जिवितांचे रक्षण करण्याची जबाबदारी असली तरी पुरसदृश्य स्थिती किंवा पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यासाठीही अग्निशमन दलाला वर्दी दिली जाते आणि हे जवान त्या बुडीतांना वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. तसेच कुणी उंचावर अडकल्यास त्याचीही सुटका मग तो मनुष्य असो वा प्राणी पक्षी असो, त्यांना वाचवण्यासाठीही अग्निशमन दलाला पाचारण करण्यात येते.

त्यामुळे आगीच्या घटनांबरोबरच इतर आपत्कालिन घटनांमध्ये तांत्रिक पध्दतीने शोध कार्य कार्य करण्याची गरज आहे. अडकलेल्या तथा बुडत असलेल्या व्यक्ती वाचवण्यासाठी तसेच उंचावर अडकलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांसह अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज निर्माण झाल्याने यासाठी एडवॉन्स फ्लड आणि रेस्क्यू ट्रेनिंग देण्यासाठी आयटम स्पोर्टस अँड प्रायव्हेट लिमिटेड संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी तीन वर्षांकरता साडे तीन कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पुरसदृश्य परिस्थिीमध्ये अत्यंत प्रभावी सेवा देण्याकरिता, अग्निशमन दलाच्या अधिकारी, जवानांना सन २०१९मध्ये प्रशिक्षण देण्यात आले होते. हे प्रशिक्षण प्राप्त केलेल्यापैकी मोठ्या प्रमाणात अधिकारी तथा जवान हे सेवानिवृत्त झाल्यामुळे अशा प्रकारचे प्रशिक्षण घेतलेलया प्राप्त अधिकारी तथा कर्मचारी यांची संख्या अल्प प्रमाणात आहे. त्यामुळे हे प्रशिक्षण इतर अधिकारी व जवानांना देण्यात येणार आहे. पुढील तीन वर्षांमध्ये हे प्रशिक्षण टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे. इंटीगेटेड टेक्निकल रेस्क्यू कोर्स हा १६ दिवसांचा तर मेंटेनेन्स टेक्निकल कोर्स १० दिवस आणि ऍडवॉन्स टेक्निकल रोप रेस्क्यू कोर्स हा १२ दिवस असेल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा