पटणा : बिहारमध्ये कोणाची सरकार स्थापन होणार याचा निर्णय आज स्पष्ट होणार आहे. सध्या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. बिहार विधानसभा एकूण २४३ जागांची असून, सत्ता स्थापन करण्यासाठी BJP, JDU किंवा RJD यांना किती जागांची आवश्यकता आहे, याचे स्पष्टीकरण या बातमीत दिले आहे. निवडणूक दोन टप्प्यांत पार पडली होती. राज्यातील ४६ मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीला टपाल मतपत्रिकांची (बॅलेट पेपर) मोजणी झाली असून, त्यानंतर आता ईव्हीएममधील मतांची मोजणी केली जात आहे. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी एका पक्षाला आवश्यक असलेल्या जागांचे गणितही या बातमीत समजावून घेऊया...
बिहार : बिहारच्या अलीनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार आणि लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर यांनी पहिल्याच प्रयत्नात भक्कम आघाडी घेतली आहे. ...
बिहारमध्ये १२२ जागांचा 'मॅजिक फिगर'
बिहारमध्ये एकूण २४३ विधानसभा जागा आहेत. कोणत्याही विधानसभेत सत्ता स्थापन करण्यासाठी एकूण जागांच्या अर्ध्या संख्येपेक्षा एक जागा जास्त मिळणे आवश्यक असते. ही संख्या म्हणजेच बहुमत. राज्यातील सत्तेचा दावा करण्यासाठी एखाद्या पक्षाला किंवा आघाडीला बहुमताची संख्या गाठावी लागते. जर एखाद्या पक्षाने किंवा आघाडीने बहुमत मिळवले, तरच ते राज्यात सरकार स्थापन करू शकतात. २४३ जागांच्या बिहार विधानसभेत सत्ता मिळवण्यासाठी किमान १२२ जागा आवश्यक आहेत. म्हणजेच १२२ किंवा त्याहून अधिक जागा मिळाल्यास त्या पक्षाला किंवा आघाडीला सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा होतो.
बिहार विधानसभा निवडणूक निकाल (सध्याचे कल)
- राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आघाडीवर : १८१
- महागठबंधन (MGB) आघाडीवर : ५८
- इतर (OTH) आघाडीवर : ४
- जनसेना पक्ष (JSP) आघाडीवर : ०
बिहारमध्ये सरकार स्थापनेसाठी किती जागा आवश्यक?
बिहार विधानसभेत सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा गाठणे अत्यावश्यक असते. एखादा पक्ष हा बहुमत स्वतंत्रपणे मिळवू शकतो किंवा आघाडीच्या माध्यमातूनही ते साध्य होऊ शकते. बिहारमध्ये सध्या एका बाजूला एनडीए (NDA) आहे, तर दुसऱ्या बाजूला महागठबंधन उभे आहे. २४३ सदस्यीय विधानसभेत सत्ता मिळवण्यासाठी किमान १२२ जागांपर्यंत पोहोचणे अनिवार्य आहे. एनडीए किंवा महागठबंधन यापैकी कोणत्याही घटकाने १२२ जागांचा टप्पा ओलांडला, तर त्यांना बहुमत प्राप्त झाल्याचे मानले जाईल. बहुमताचा हा आकडा मिळाल्यानंतर त्या पक्षाला किंवा आघाडीला बिहारमध्ये सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा होतो.
बिहार विधानसभा निवडणूक २०२० : कोण आघाडीवर होते?
बिहार विधानसभा निवडणूक २०२० मध्येही एनडीए (NDA) आणि महागठबंधन यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. दोन्ही आघाड्यांमध्ये कडवी टक्कर झाली असली तरी शेवटी बहुमताचा आकडा एनडीएनेच पार केला. २०२०च्या निकालानुसार, एनडीएने एकूण १२५ जागांवर विजय मिळवला होता. दुसरीकडे, महागठबंधननेही मजबूत कामगिरी करत ११० जागांवर विजय मिळवला होता, मात्र ते बहुमताच्या आवश्यक टप्प्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. या निकालानंतर बिहारमध्ये एनडीएची सत्ता कायम राहिली.






