Friday, November 14, 2025

घाटकोपर झुणझुणवाला महाविद्यालय ते अंधेरी-घाटकोपर जोड मार्गाच्या रुंदीकरणाचा मार्ग खुला

घाटकोपर झुणझुणवाला महाविद्यालय ते अंधेरी-घाटकोपर जोड मार्गाच्या रुंदीकरणाचा मार्ग खुला

आणखी ३७ बांधकामांवर महापालिकेची कारवाई

मुंबई (खास प्रतिनिधी) : घाटकोपर येथील झुणझुणवाला महाविद्यालय ते अंधेरी-घाटकोपर जोड मार्गाच्या (एजीएलआर) रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या ३७ बांधकामांवर महानगरपालिकेच्या ‘एन’ विभाग कार्यालयाच्या वतीने शुक्रवारी १४ नोव्हेंबर २०२५रोजी कारवाई करून ते सर्व बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.

मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात, उपायुक्त (परिमंडळ-६) संतोषकुमार धोंडे यांच्या देखरेखीखाली, सहायक आयुक्त (एन विभाग) डॉ. गजानन बेल्लाळे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

घाटकोपर (पश्चिम) येथील रेल्वे स्थानकाला समांतर असलेल्या झुणझुणवाला महाविद्यालय ते अंधेरी-घाटकोपर जोड मार्गादरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. या रुंदीकरणाच्या कामात रस्त्यालगत असलेल्या काही बांधकामांमुळे अडथळा निर्माण झाला होता. या रस्त्याच्या बांधकामामुळे बाधित झालेली ३७ बांधकामे शुक्रवारी तोडण्यात आले.

घाटकोपर येथील झुणझुणवाला महाविद्यालय ते अंधेरी-घाटकोपर जोड मार्गाच्या (एजीएलआर) रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या २४ बांधकामांवर महानगरपालिकेच्या ‘एन’ विभाग कार्यालयाच्या वतीने गुरुवारी १३ नोव्हेंबर २०२५ रोजी कारवाई करण्यात आली होती. ही सर्व बांधकामे जमिनदोस्त करण्यात आली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >