Thursday, November 13, 2025

शिउबाठाचा माजी आमदार शिवसेनेत, 'स्थानिक'च्या निवडणुकीआधीच उद्धव ठाकरेंना धक्का

शिउबाठाचा माजी आमदार शिवसेनेत, 'स्थानिक'च्या निवडणुकीआधीच उद्धव ठाकरेंना धक्का

कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्ष आणि ठाकरे गटाच्या उमेदवारांमध्ये जोरदार लढती झाल्या. मात्र, शिंदेंनी बाजी मारत ५७ आमदार निवडून आणले आहेत. त्यामुळे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षामध्ये जोरदार इनकमिंग चालू असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये आता ठाकरेंच्या गटातील कोल्हापूर जिल्ह्यातील मोठा आणि अनुभवी नेता शिंदेंच्या गळाला लागला आहे.

विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरात ठाकरे गटाच्या वाट्याला केवळ दोन जागा आल्याने ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. तर, शिरोळमधील ठाकरे गटाचे माजी आमदार उल्हास पाटील हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत परतले होते. आता, नगरपालिका, महापालिका निवडणुकांपूर्वी त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. त्यामुळे, कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाच्या गळाला मोठा नेता लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

ठाकरे गटाचे आमदार राहिलेले उल्हास पाटील यांनी आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. २०२४ साली उल्हास पाटील शिवसेनेकडून शिरोळचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर २०२४ सालची विधानसभा निवडणूक त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावर लढवली. मात्र, त्यांना पराभव पत्कारावा लागला असल्याने त्यांनी शिवसेनेची वाट धरली आहे.

Comments
Add Comment