Thursday, November 13, 2025

डिजिटल व्यवसाय आणि उद्योजकता

डिजिटल व्यवसाय आणि उद्योजकता

करिअर : सुरेश वांदिले

डिजिटल व्यवसाय आणि उद्योजकता विषयातील बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (बीबीए-डीबीइ) हा ऑनलाइन अभ्यासक्रम आहे. यामध्ये डिजिटल तंत्रज्ञान, व्यवसाय व्यवस्थापन आणि उद्योजकतेचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. हा अभ्यासक्रम डिजिटल व्यवसाय क्षेत्रातील करिअरसाठी उपयुक्त ठरतो. या अभ्यासक्रमात डिजिटल धोरणे आणि उद्योजकीय उपक्रमांवर भर दिला जातो. प्रत्यक्ष अनुभवासाठी थेट सत्रांद्वारे मार्गदर्शन केले जाते. प्रकल्प कार्यावर भर दिला जातो. या अभ्यासक्रमाचा केंद्रबिंदू नेटवर्किंग असून, व्यावसायिकांशी सहकार्य आणि संपर्क साधण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे करिअरच्या संधी वाढतात. या अभ्यासक्रमाद्वारे सतत बदलणाऱ्या डिजिटल जगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान प्रदान केली जातात. या तीन वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमाद्वारे डिजिटल युगातील व्यवसायांसाठी धोरणे विकसित करून अमलात आणण्याची क्षमता प्राप्त करणे शक्य होते. नव्या डिजिटल तंत्रज्ञानांची माहिती मिळवता येते. व्यवसाय संधी आणि व्यवसाय वाढीस चालना देणारे निर्णय घेण्यास सक्षम केले जाते. हा अभ्यासक्रम प्रत्यक्ष अनुभवावर आधारित शिक्षणावर भर देतो. वास्तवात व्यवसायातील आव्हानांना सामोरे जाऊन नावीन्यपूर्ण उपाययोजना विकसित करणे शक्य होऊ शकते. व्यवसायाच्या यशासाठी विश्लेषणात्मक साधने आणि तंत्रांचा उपयोग करणे शक्य होते.

अर्हता :

कोणत्याही ज्ञानशाखेतील १२वी किंवा समतूल्य पात्रता (खुला प्रवर्ग, नॉन क्रिमिलेअर ओबीसी आणि इडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी : किमान ६०% गुण किंवा समतूल्य एकूण ग्रेड पॉइंट सरासरी (सीजीपीए) आवश्यक. एसस्सी, एसटी, दिव्यांग उमेदवार-किमान ५५% गुण किंवा समतुल्य सीजीपीए आवश्यक. प्रवेश प्रकिया : या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पुढील चाळणी परीक्षांमधील गुण ग्राह्य धरले जातात. (१) खुला संवर्ग : आयआयएमबी - डीबीइ एन्ट्रन्स टेस्ट - किमान ५०% गुण किंवा (२) सीयुइटी (कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट) : जीएटी (जनरल ॲप्टिट्यूड टेस्ट) - किमान ७०% गुण (३) जेईई मेन किमान ५०% गुण. जे उमेदवार एकापेक्षा अधिक प्रवेश परीक्षांचे गुण सादर करतात, त्यांचे सर्वोत्तम गुण ग्राह्य धरण्यात येतात.

संपर्क : https: //dbe.iimb.ac.in/जिटल व्यवसाय आणि उद्योजकता विषयातील बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (बीबीए-डीबीइ) हा ऑनलाइन अभ्यासक्रम आहे. यामध्ये डिजिटल तंत्रज्ञान, व्यवसाय व्यवस्थापन आणि उद्योजकतेचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. हा अभ्यासक्रम डिजिटल व्यवसाय क्षेत्रातील करिअरसाठी उपयुक्त ठरतो. या अभ्यासक्रमात डिजिटल धोरणे आणि उद्योजकीय उपक्रमांवर भर दिला जातो. प्रत्यक्ष अनुभवासाठी थेट सत्रांद्वारे मार्गदर्शन केले जाते. प्रकल्प कार्यावर भर दिला जातो. या अभ्यासक्रमाचा केंद्रबिंदू नेटवर्किंग असून, व्यावसायिकांशी सहकार्य आणि संपर्क साधण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे करिअरच्या संधी वाढतात. या अभ्यासक्रमाद्वारे सतत बदलणाऱ्या डिजिटल जगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान प्रदान केली जातात. या तीन वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमाद्वारे डिजिटल युगातील व्यवसायांसाठी धोरणे विकसित करून अमलात आणण्याची क्षमता प्राप्त करणे शक्य होते. नव्या डिजिटल तंत्रज्ञानांची माहिती मिळवता येते. व्यवसाय संधी आणि व्यवसाय वाढीस चालना देणारे निर्णय घेण्यास सक्षम केले जाते. हा अभ्यासक्रम प्रत्यक्ष अनुभवावर आधारित शिक्षणावर भर देतो. वास्तवात व्यवसायातील आव्हानांना सामोरे जाऊन नावीन्यपूर्ण उपाययोजना विकसित करणे शक्य होऊ शकते. व्यवसायाच्या यशासाठी विश्लेषणात्मक साधने आणि तंत्रांचा उपयोग करणे शक्य होते.

अर्हता :

कोणत्याही ज्ञानशाखेतील १२वी किंवा समतूल्य पात्रता (खुला प्रवर्ग, नॉन क्रिमिलेअर ओबीसी आणि इडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी : किमान ६०% गुण किंवा समतूल्य एकूण ग्रेड पॉइंट सरासरी (सीजीपीए) आवश्यक. एसस्सी, एसटी, दिव्यांग उमेदवार-किमान ५५% गुण किंवा समतुल्य सीजीपीए आवश्यक. प्रवेश प्रकिया : या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पुढील चाळणी परीक्षांमधील गुण ग्राह्य धरले जातात. (१) खुला संवर्ग : आयआयएमबी - डीबीइ एन्ट्रन्स टेस्ट - किमान ५०% गुण किंवा (२) सीयुइटी (कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट) : जीएटी (जनरल ॲप्टिट्यूड टेस्ट) - किमान ७०% गुण (३) जेईई मेन किमान ५०% गुण. जे उमेदवार एकापेक्षा अधिक प्रवेश परीक्षांचे गुण सादर करतात, त्यांचे सर्वोत्तम गुण ग्राह्य धरण्यात येतात. संपर्क : https://dbe.iimb.ac.in/

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >