Friday, December 5, 2025

देशभरात सहा कोटी मृतांचे आधारकार्ड सक्रिय

देशभरात सहा कोटी मृतांचे आधारकार्ड सक्रिय
नवी दिल्ली : आधारकार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरला जातो. आधारकार्ड असेल तरच बँक खाते उघडले जाते. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठीही आधार आवश्यक समजले जाते, परंतु देशात सहा कोटी मृत झालेल्या व्यक्तींचे आधारकार्ड अजूनही सक्रिय आहेत. देशभरात आठ कोटींहून अधिक आधारकार्डधारकांचा मृत्यू होऊनही केवळ १.८३ कोटी आधारकार्ड निष्क्रिय करण्यात आले आहेत, तर उर्वरित सहा कोटी आधारकार्ड सक्रिय आहेत. यामुळे भविष्यात या आधारकार्डचा वापर करून बँकेची फसवणूक, बनावट खाती सरकारी योजनांचा लाभ घेण्याचा गैरप्रकार होऊ शकतो. यूआयडीएआयचे सीईओ भुवनेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाकडून १५.५ दशलक्ष मृत व्यक्तींचा डेटा मिळाला आहे. नोव्हेंबर २०२४ ते सप्टेंबर २०२५ दरम्यान यादीत अतिरिक्त ३.८ दशलक्ष व्यक्तींची भर पडली आहे. यापैकी १.१७ कोटी लोकांची ओळख पटल्याने त्यांचे आधारकार्ड निष्क्रिय करण्यात आले आहेत.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >