Biharelection2025 : बिहार विधानसभा निवडणुकीत दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर मतदारसंघाने या वेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कारण पहिल्यांदाच राजकीय मैदानात उतरलेल्या लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरला भाजपने उमेदवारी दिली होती. मतमोजणी सुरू झाल्यापासून मैथिलीच्या मतदारसंघात काय होणार याकडे अनेकांचे लक्ष होते.
बिहारमधील अलीनगर मतदारसंघातून भाजपने गायिका मैथिली ठाकूरला उमेदवारी दिली. मैथिली विरोधात RJDने बिनोद मिश्राला उमेदवारी दिली. जनसुराज पक्षाने बिप्लब कुमार चौधरी याला उमेदवारी दिली होती. अलीनगर मतदारसंघासाठी एकूण १२ उमेदवार मैदानात उतरले होते.
अलीनगर विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण २५ फेऱ्या झाल्या, भाजपच्या मैथिली ठाकूरने एकूण ८४ हजार ९१५ मते मिळवली. मैथिलीचा विधानसभेच्या निवडणुकीत ११ हजार ७३० मतांनी विजय झाला. या निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाच्या अर्थात आरजेडीच्या बिनोद मिश्रा यांना एकूण ७३ हजार १८५ मते मिळाली. त्यांचा या निवडणुकीत ११ हजार ७३० मतांनी पराभव झाला. विजयी झालेली मैथिली ठाकूर ही अवघ्या २५ वर्षांची आहे. ती बिहारची तरुण आमदार म्हणून लवकरच विधानसभेत आमदारकीची शपथ घेणार आहे.






