Thursday, November 13, 2025

दहिसरच्या राजकारणात उलथापालथ, वॉर्ड क्रमांक १ घोसाळकर कुटुंबाच्या आवाक्याबाहेर!

दहिसरच्या राजकारणात उलथापालथ, वॉर्ड क्रमांक १ घोसाळकर कुटुंबाच्या आवाक्याबाहेर!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. पण राजकारणात हालचाली सुरू झाल्या आहेत. दहिसरमधील वॉर्ड क्रमांक १, जो गेली अनेक वर्ष घोसाळकर कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जात होता, यावेळी त्यांच्या आवाक्याबाहेर जाणार आहे. कारण, नव्या प्रभागरचनेनुसार हा वॉर्ड महिला ओबीसी घोषित झाला आहे.

या वॉर्डमध्ये २०१२ ते २०१७ दरम्यान अभिषेक घोसाळकर नगरसेवक होते, तर २०१७ पासून तेजस्वी घोसाळकर नगरसेविका म्हणून काम पाहत होत्या. याआधी विनोद घोसाळकर दहिसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून कार्यरत होते. त्यामुळे या परिसरात घोसाळकर कुटुंबाचे वर्चस्व होते. मात्र, नव्या आरक्षणामुळे या कुटुंबाला वॉर्ड क्रमांक १ मधून उमेदवारी घेता येणार नाही.

तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या, “वॉर्ड क्रमांक १ माझ्या कुटुंबाशी भावनिकरित्या जोडलेला आहे. मात्र, या वेळी आरक्षणामुळे तिथून निवडणूक लढवणे शक्य नाही, ही खंत आहे. आता वॉर्ड क्रमांक ७, ८ किंवा २ मधून संधी मिळाल्यास लढण्याची तयारी आहे.”

तेजस्वी या शिउबाठाचे नेते विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई तर माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर लिहिलं आहे, “माझ्या वॉर्डमध्ये ओबीसी महिला आरक्षण लागू झाल्याने मी निवडणूक लढवू शकत नाही. ही गोष्ट वैयक्तिकदृष्ट्या खूप वेदनादायक आहे.”

सध्या दहिसर विधानसभा मतदारसंघातील बहुतांश वॉर्डांवर भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक आहेत. येत्या निवडणुकीत या मतदारसंघात कोण बाजी मारणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >