Thursday, November 13, 2025

सुरूवातीच्या कलात शेअर बाजारात बाजारात घसरण मात्र अस्थिरतेतही होणार रिकव्हरी? निफ्टी २६१३० पार करणार? जाणून घ्या सुरूवातीचे सविस्तर विश्लेषण

सुरूवातीच्या कलात शेअर बाजारात बाजारात घसरण मात्र अस्थिरतेतही होणार रिकव्हरी? निफ्टी २६१३० पार करणार? जाणून घ्या सुरूवातीचे सविस्तर विश्लेषण

मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात घसरण झाली आहे. खरं तर गिफ्ट निफ्टीत चढउतार कायम होते मात्र शेअर बाजारात सकाळी घसरण झाली आहे. सेन्सेक्स २१ अंकाने घसरला असून निफ्टी ५० हा ३२.५० अंकांने घसरला आहे. सकाळच्या सत्रात शेअर बाजारातील आश्वासकता स्पष्ट झाली नसल्याने घसरणीकडे अथवा सपाट पातळीवर बाजाराचा कल दिसत आहे. किंबहुना भारतीय बाजार रिकव्हरीही करु शकतो. कारण भारताने वाढत्या टॅरिफ अस्थिरतेला उत्तर म्हणून ४५०६० कोटींच्या योजनेला मंजुरी दिल्याने एमएसएमई क्षेत्रातील उद्योगांना या योजनेचा विशेषतः निर्यात प्रधान उद्योगांना लाभ होणार आहे. निश्चितच याचा परिणाम क्षेत्रीय विशेष समभागात दिसून येऊ शकतो. याशिवाय युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात हा देखील भारतीय बाजारासाठी महत्वाचा असून कालच्या भारतातील सीपीआय (ग्राहक किंमत निर्देशांक) सकारात्मक आकडेवारी ही संमिश्रित तिमाही निकालानंतर होणाऱ्या नुकसानाला बाजारात भरून काढू शकते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. दुसरीकडे बिहार विधानसभा निवडणुकीतील उद्याच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर काही काळ आज बाजारात संभ्रम देखील कायम असू शकतो. अर्थात एक्सिट पोलमध्ये स्पष्ट करण्यात आल्याप्रमाणे भाजप व मित्रपक्ष वरचढ ठरणार असले तरी अद्याप अनिश्चितता कायम आहे. याशिवाय आज विशेषतः परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार महत्वाची भूमिका आज बाजारात वठवू शकतात.

सकाळच्या सत्रात मिडकॅप, बँक निर्देशांकात किरकोळ घसरण झाल्याने तसेच आयटी, मेटल, एफएमसीजी, मिड स्मॉल आयटी टेलिकॉम या क्षेत्रीय निर्देशांकात घसरण झाली असून मेटल, मिडिया, रिअल्टी, फार्मा, मिडस्मॉल हेल्थकेअर निर्देशांकात वाढ झाली आहे. तसेच निफ्टी व्यापक निर्देशांकात मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये वाढ झाल्याने बाजारात रिकव्हरीचे संकेत मिळत आहेत. याखेरीज युएस बाजारातील शटडाऊन बंद झाल्याने वैश्विक बाजारात अखेरपर्यंत सकारात्मक स्थिती पहायला मिळू शकते.

सकाळी आशियाई बाजारातील सुरूवातीच्या कलात गिफ्ट निफ्टी (०.०१%), निकेयी २२५ (०.१९%), सेट कंपोझिट (०.३९%), शांघाई कंपोझिट (०.४४%) या निर्देशांकात वाढ झाली असून हेंगसेंग (०.५०%), स्ट्रेट टाईम्स (०.११%), तैवान वेटेड (०.०६%) निर्देशांकात घसरण झाली आहे. तर काल युएस बाजारात डाऊ जोन्स (०.३०%), एस अँड पी ५०० (०.०६%) बाजारात वाढ झाली असून नासडाक (०.३७%) बाजारात घसरण झाली होती.

आज सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ डेटा पँटर्न (८.९३%), होनसा कंज्यूमर (७.०२%), रामकृष्ण फोर्ज (६.६०%), जे एम फायनांशियल सर्व्हिसेस (४.६५%), अशोक लेलँड (४.६०%), एथर एनर्जी (३.५०%), एशियन पेंटस (३.१६%), झेन टेक्नॉलॉजी (३.१०%), सिग्नेचर ग्लोबल (२.९८%) समभागात झाली आहे.

आज सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण कोहान्स लाईफ (६.१८%), लेमन ट्री हॉटेल (३.९५%), कोचीन शिपयार्ड (३.२९%), ज्योती सीएनसी ऑटो (२.०१%), वेलस्पून लिविंग (१.७७%), इन्फोऐज इंडिया (१.९५%), सुप्रीम इंडस्ट्रीज (१.६१%), ओएनजीसी (१.५४%), कोफोर्ज (१.३६%), पीबी फिनटेक (१.३५%), एलटी फूडस (१.२९%) समभागात झाली आहे.

आजच्या बाजारपूर्व परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,'बाजाराला नवीन विक्रमी उच्चांकावर नेण्यासाठी अधिक ट्रिगर्सची आवश्यकता आहे. बिहार निवडणुकीच्या निकालांना बाजाराने मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित केले असल्याने, बाजाराला लक्षणीयरीत्या वर नेणारे कोणतेही राजकीय ट्रिगर्स नाहीत. प्रत्यक्ष मतदानाचे निकाल एक्झिट पोलपेक्षा वेगळे आढळल्यास उलट घडू शकते.ज्या महत्त्वाच्या आर्थिक घटकांवर लक्ष ठेवावे लागेल ते म्हणजे भारत-अमेरिका व्यापार करार, ज्यामुळे दंडात्मक शुल्क काढून टाकणे आणि परस्पर शुल्क कमी करणे. ऑक्टोबरमध्ये भारतातील किरकोळ महागाई ०.२५% पर्यंत घसरणे हे डिसेंबरमध्ये MPC कडून दर कपात होण्याची शक्यता दर्शवते. परंतु चलनविषयक धोरणाचे प्रसारण कमकुवत होणे आरबीआयसाठी एक आव्हान बनले आहे. जवळच्या काळात बाजार एकत्रित होण्याची शक्यता आहे आणि नंतर जेव्हा ते उद्भवतील तेव्हा त्यांना प्रतिसाद देण्याची शक्यता आहे. एकाच वेळी होणाऱ्या सकारात्मक ट्रिगर्समुळे शॉर्ट-कव्हरिंग होऊ शकते ज्यामुळे बाजार वेगाने वर जाऊ शकतो. परंतु एफआयआय विक्री आणि वाढलेले मूल्यांकन पाहता सतत वाढण्याचा ट्रेंड आव्हानात्मक असेल.'

आजच्या बाजारातील निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य बाजार रणनीतीकार आनंद जेम्स म्हणाले आहेत की,'काल आमच्या २५८५०-९८० पातळीच्या लक्ष्य क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर निर्माण झालेला डोजी अनिर्णयतेचे संकेत देतो, ज्यामुळे सावधगिरी बाळगावी लागते. तथापि, ऑसिलेटर मोठ्या वाढीकडे अनुकूल आहेत, २६१३०-२६५५० पातळीचे लक्ष्य ठेवत आहेत. तथापि, जर सुरुवातीची घसरण २५८४० पातळीच्या वर रोखण्यात अयशस्वी झाली तर दिवसाच्या वाढीच्या गतीला आव्हान दिले जाऊ शकते, परंतु बाजू बदलण्यासाठी आम्ही २५६३० पातळीच्या खाली घसरण्याची वाट पाहू.'

सकाळच्या बाजारपूर्व परिस्थितीवर विश्लेषण करताना चॉईस इक्विटी ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या तांत्रिक व विश्लेषक अमृता शिंदे म्हणाल्या आहेत की,' मागील सत्रात, निफ्टी सुमारे १३० अंकांच्या वाढीसह मजबूत पातळीवर उघडला आणि दिवसभर तो तेजीच्या दिशेने व्यवहार करत होता, ज्यामुळे खरेदीची उत्सुकता आणि सहभागींमध्ये सुधारणा दिसून येते. तात्काळ प्रतिकार आता २५९५० पातळीवर आहे, त्यानंतर २६००० पातळीवर आहे, तर २५७०० आणि २५७५० पातळीवर आधार स्थितीत्मक असून व्यापार्‍यांसाठी संचय क्षेत्र म्हणून काम करण्याची शक्यता आहे.बँक निफ्टीने देखील व्यापक बाजाराच्या ताकदीचे प्रतिबिंब दाखवले, नवीन खरेदीची आवड आणि तेजीची गती सुरू राहण्याची शक्यता दर्शविली. प्रमुख आधार ५८००० पातळीवर आहे आणि या पातळीपेक्षा कमी ब्रेकमुळे ५८१०० पातळीपर्यंत मर्यादित घसरण होऊ शकते. वरच्या बाजूला, प्रतिकार (Resistance) ५८५०० वर दिसून येतो आणि या झोनच्या वर ब्रेकआउटमुळे रॅली ५८६०० पातळीपर्यंत वाढू शकते.

संस्थात्मक आघाडीवर, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) १२ नोव्हेंबर रोजी सलग तिसऱ्या सत्रात त्यांची विक्रीची मालिका सुरू ठेवली, त्यांनी १७५० कोटी रुपयांचे शेअर्स विकले. उलट, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) सातत्याने खरेदीदार राहिले, त्यांनी ५१०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे शेअर्स खरेदी केले, ज्यामुळे बाजाराला सतत आधार मिळाला.

सध्याची अस्थिरता आणि मिश्र जागतिक पार्श्वभूमी पाहता, व्यापाऱ्यांना सल्ला दिला जातो की त्यांनी सावधगिरीने खरेदी-विक्रीचा दृष्टिकोन राखावा, विशेषतः लीव्हरेज वापरताना प्रभावी जोखीम व्यवस्थापनासाठी रॅली दरम्यान अंशतः नफा बुकिंग आणि कडक ट्रेलिंग स्टॉप-लॉसचा वापर महत्त्वपूर्ण असेल. निफ्टी २६१०० पातळीच्या वर टिकून राहिला तरच नवीन दीर्घ पोझिशन्सचा विचार केला पाहिजे. व्यापक बाजाराचा अंदाज सावधपणे तेजीत असला तरी, बाजाराचा नजीकच्या काळात मार्ग निश्चित करण्यासाठी प्रमुख तांत्रिक पातळी आणि जागतिक घडामोडींचा बारकाईने मागोवा घेणे आवश्यक असेल.'

Comments
Add Comment