Thursday, November 13, 2025

नवले पुलावर भीषण अपघात, तीन वाहनांनी घेतला पेट, सात जणांचा मृत्यू!

नवले पुलावर भीषण अपघात, तीन वाहनांनी घेतला पेट, सात जणांचा मृत्यू!

चालत्या कंटेनरने अचानक ब्रेक दाबला, भरधाव कार मागून धडकली, कारच्या मागून दुसरा कंटेनर घुसला

पुणे : पुणे शहरात भीषण अपघाताची घटना घडली आहे. नवले पुल परिसरात झालेल्या या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या अपघातात दोन ते तीन वाहनांना आग लागल्याने परिसरात मोठी धावपळ उडाली. या घटनेत सुमारे २० जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे, मात्र मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन कंटेनर आणि एक कार यांची जोरदार धडक होऊन हा अपघात झाला. दोन कंटेनरच्या मधोमध एक कार अडकून पेटली. जळत असलेल्या कारमधून एक कुटुंब प्रवास करत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आग विझवण्यात यश आले असून सध्या बचावकार्य सुरू आहे.

नवले पुल परिसरात अपघातांच्या घटना वारंवार घडत असल्याने या ठिकाणच्या सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अपघातानंतर काही काळासाठी नवले पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. सध्या रस्त्यावरची वाहतूक हळूहळू पूर्ववत केली जात आहे, मात्र परिसरात अजूनही पोलिसांचा ताफा तैनात आहे.

या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करत, मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >