Thursday, November 13, 2025

किआ इंडियाने किआ आणि मल्टीब्रँड वाहनांसाठी नवीन वॉरंटी प्लॅनसह व्यवसायात मजबूती नोंदवली

किआ इंडियाने किआ आणि मल्टीब्रँड वाहनांसाठी नवीन वॉरंटी प्लॅनसह व्यवसायात मजबूती नोंदवली

किआ इंडियाने किआ मेक प्री-मालकीच्या कारचे प्रमाणपत्र वय ५ वर्षांवरून ७ वर्षांपर्यंत वाढवले आहे, २४ महिने किंवा ४०००० किमी जे आधी असेल ते वॉरंटी असेल

किआ सीपीओ नेटवर्कद्वारे विकल्या जाणाऱ्या इतर ब्रँड प्री-मालकीच्या वाहनांचे कियाने प्रमाणपत्र सादर केले आहे ज्याची वॉरंटी १२ महिने किंवा १५००० किमी जे आधी असेल ते असेल असे कंपनीने म्हटले

मुंबई: किआ इंडियाने त्यांच्या प्रमाणित पूर्वमालकीच्या (Certified Pre Owned) कार्यक्रमात किआ आणि इतर ब्रँड वाहनांसाठी वॉरंटी अपग्रेडची घोषणा केली आहे. किआ इंडियाने प्री-ओन्ड किआ मॉडेल्सची प्रमाणित (Certified) वयोमर्यादा ५ वर्षांवरून ७ वर्षांपर्यंत वाढवली असल्याचे कंपनीने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. या वॉरंटी अंतर्गत किआ वॉरंटी २४ महिने किंवा ४०००० किमी जे आधी असेल ते पुरविले जाते असे कंपनीने यावेळी स्पष्ट केले. ग्राहकांना अधिक लवचिकता प्रदान करण्यासाठी धोरणात्मक पाऊल उचलत किआ इंडियाने त्यांच्या सीपीओ शोरूमद्वारे विकल्या जाणाऱ्या इतर ब्रँड वाहनांसाठी १२ महिने किंवा १५००० किमी, जे आधी असेल ते वॉरंटी कव्हरेज देखील सादर केले आहे.

या उपक्रमाअंतर्गत 'प्री-ओन्ड कार सर्टिफिकेशन प्रोग्राम' हा उपक्रम ग्राहकांना ब्रँडची पर्वा न करता प्री-ओन्ड कारच्या विस्तृत श्रेणीतून निवड करण्यास सक्षम करतो, त्याच वेळी किआच्या प्रमाणित मानकांसह येणारा आत्मविश्वास आणि मनःशांतीचा आनंद घेतो अशा शब्दांत कंपनीने आपल्या नव्या घडामोडीवर बोलताना म्हटले.

याविषयी भाष्य करताना किआ इंडियाचे सेल्स अँड मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष अतुल सूद म्हणाले आहेत की,'किया इंडिया ग्राहक-केंद्रित नवोपक्रमांना प्राधान्य देत आहे. किआ सीपीओ वॉरंटी वाढवून आणि इतर ब्रँड वाहनांसाठी वॉरंटी कार्यक्रम सुरू करून आम्ही उच्च-गुणवत्तेची, प्रमाणित वाहने अधिक सुलभ आणि विश्वासार्ह बनवत आहोत. हे उपक्रम प्रत्येक खरेदीदाराला - त्यांनी कोणताही ब्रँड निवडला तरीही मनःशांती, पारदर्शकता आणि अपवादात्मक मालकी अनुभव देण्याची आमची वचनबद्धता दर्शवितात.'

किआ सर्टिफाइड प्री-ओन्ड (सीपीओ) म्हणजे नक्की काय?

या कार्यक्रमांतर्गत विकल्या जाणाऱ्या प्रत्येक प्री-ओन्ड कारची १७५ मुद्यांवर व्यापक तपासणी केली जाते असा सर्वसाधारण अंदाज आहे. केवळ या मानक गुणवत्ता मानदंडांची (Standard Talents Parameters) हे यशस्वीरित्या पूर्तता करणारी वाहने सीपीओ नेटवर्कद्वारे प्रमाणित केली जातात असा दावा कंपनीचा आहे तसेच विक्रीसाठीही ऑफर केली जातात. हे कठोर मूल्यांकन ग्राहकांसाठी सुसंगतता पारदर्शकता आणि दीर्घकालीन विश्वासार्हता सुनिश्चित करते.

किआ इंडियाचे भारतात सर्वात वेगाने वाढणारे प्रमाणित प्री-ओन्ड नेटवर्क आहे ज्याचे देशभरात ११४ आउटलेट आहे. एप्रिल २०१७ मध्ये, किआ इंडियाने अनंतपूर जिल्ह्यात एक नवीन उत्पादन सुविधा बांधण्यासाठी आंध्र प्रदेश राज्य सरकारसोबत सामंजस्य करार (MOU) केला होता. किआने ऑगस्ट २०१९ मध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू केले आणि त्याची वार्षिक उत्पादन क्षमता ३००००० युनिट्स आहे नवीन ब्रँड अंतर्गत, किआने नवीन मानदंड (बेंचमार्क)साध्य करण्याचे आणि ग्राहकांना अधिकाधिक होण्यासाठी आणि अधिक काम करण्यासाठी प्रेरित करण्याचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला आहे असे कंपनीने आपल्या निवेदनात यापूर्वीच म्हटले होते.आतापर्यंत, किआ इंडियाने भारतीय बाजारपेठेसाठी नऊ वाहने लाँच केली आहेत ज्यामध्ये सेल्टोस, सायरोस, सोनेट, केरेन्स, कार्निवल, ईव्ही६, ईव्ही९, केरेन्स क्लॅव्हिस आणि पूर्णपणे नवीन केरेन्स क्लॅव्हिस ईव्ही या गाड्यांचा समावेश आहे. किआ इंडियाने त्यांच्या अनंतपूर प्लांटमधून जवळजवळ १.५ दशलक्ष वाहनांची डिलिव्हरी आतापर्यंत पूर्ण केली आहे, ज्यामध्ये १.२ दशलक्षाहून अधिक देशांतर्गत विक्री आणि ३.६७ लाखांहून अधिक निर्यात समाविष्ट आहे. भारतीय रस्त्यांवर ४.७ लाखांहून अधिक कनेक्टेड कारसह, ते देशातील कनेक्टेड कार लीडरपैकी एक आहे. या ब्रँडचे ३२९ शहरांमध्ये ७४४ टचपॉइंट्सचे विस्तृत नेटवर्क आहे आणि देशभरात त्यांनी त्यांची उपस्थिती मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

Comments
Add Comment