Thursday, November 13, 2025

'भंगारातून उन्नतीकडे' भारताच्या स्टील डीकार्बोनायझेशन व ग्रीन स्टील प्रयत्नांसाठी mjunction व्यासपीठाचा पुढाकार !

'भंगारातून उन्नतीकडे' भारताच्या स्टील डीकार्बोनायझेशन व ग्रीन स्टील प्रयत्नांसाठी mjunction व्यासपीठाचा पुढाकार !

मोहित सोमण: स्टीलमधील टाकाऊ पदार्थ (Scrap) ज्याला सर्वसाधारण भंगार म्हणतात ते मुख्यतः ग्रीन स्टीलसाठी प्रमुख इनपुट म्हणून उदयास येत आहे असे १२ व्या भारतीय स्टील मार्केट्स कॉन्फरन्समधील वक्त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले आहे.१२ व्या भारतीय स्टील मार्केट्स कॉन्फरन्सच्या उद्घाटन सत्रात स्टीलचे पुर्नउत्थानाचे (Steel Scrap Recycling Usage) बाबत महत्व सांगण्यात आले आहे. भारतात गेल्या काही वर्षांत स्टील उत्पादनात व विक्रीत प्रचंड वाढ होत आहे. मात्र दुसरीकडे मोठ्या प्रमाणात विविध उद्योगांसाठी लागणाऱ्या स्क्रॅप (भंगार) खरेदीत मोठी वाढ झाली आहे. दरवर्षी इयर ऑन इयर बेसिसवर ६% हून अधिक वाढ या उपभोगात (Scrap Usage) होत आहे. त्यामुळे भारतातील स्टील उद्योगाची प्रगती व आव्हाने यावर एमजंक्शन (mjunction's) या कंपनीच्या वतीने भारतीय स्टील कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. स्टील क्षेत्राचे डीकार्बोनायझेशन करण्याच्या जागतिक चिंतेच्या अनुषंगाने या वर्षी परिषदेची थीम 'इंडियन स्टील व्हॅल्यू चेन रिसायकल रिशेप इनोव्हेट सस्टेन' अशी ठरवलेली आहे. त्यावर विविध मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली.

यापैकी,' स्टील ही अशा काही पदार्थांपैकी एक आहे जी त्याची ताकद किंवा गुणवत्ता न गमावता अमर्यादपणे पुनर्वापर करता येते. त्यामुळे ते केवळ औद्योगिक वाढीचाच नव्हे तर शाश्वततेचाही कणा बनते. भारत आज दरवर्षी सुमारे ४२ दशलक्ष टन भंगार वापरतो आणि हा आकडा दरवर्षी ६% पेक्षा जास्त वाढत आहे. दरवर्षी देशात सुमारे ९ दशलक्ष टन भंगार आयात केले जाते' असे एमजंक्शन सर्व्हिसेस लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक विनया वर्मा यांनी एमजंक्शन सर्व्हिसेस लिमिटेडने आयोजित केलेल्या दोन दिवसीय १२ व्या भारतीय स्टील मार्केट्स कॉन्फरन्सच्या उद्घाटन सत्रात सांगितले.

'शाश्वतता आता पर्यायी राहिलेली नाही तर धोरणात्मक आहे' असे सेलचे कार्यकारी संचालक सय्यद जावेद अहमद म्हणाले. सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी शाश्वतता कशी स्वीकारत आहे आणि विकसित होत असलेल्या हरित स्टील मानकांची पूर्तता करण्यासाठी क्षमता निर्माण करत आहे याची माहिती देताना ते म्हणाले. स्टीलची मागणी वाढत असताना स्क्रॅप सोर्सिंग हा भारतासाठी एक प्रमुख चिंतेचा विषय आहे.

डुफेर्को एशिया प्रा. लि.चे एमडी शुभेंदू बोस यांच्या मते, येत्या काही वर्षांत भारतातील स्टील क्षमता लक्षणीयरीत्या वाढण्याची योजना आहे. 'सरकारी भांडवली खर्च ६०% स्टील वापराला चालना देत असताना, भारताची तरुण आणि वाढती लोकसंख्या देखील मागणी निर्माण करत आहे'असे आयसीआरएचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि कॉर्पोरेट सेक्टर रेटिंग्जचे गट प्रमुख गिरीशकुमार कदम म्हणाले.

स्टीलची मागणी आणि उत्पादन वाढत असताना, या क्षेत्राला कच्च्या मालाच्या सोर्सिंग आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. टाटा स्टीलचे कच्च्या मालाचे उपाध्यक्ष संदीप कुमार यांच्या मते, 'कोकिंग कोळशाची (Coking Coal) आयात दीर्घकाळात महाग होणार आहे तर लोहखनिज खाणींसाठी आक्रमक बोली लावल्याने देशांतर्गत लोहखनिजाच्या किमती वाढणार आहेत.

डीकार्बोनायझेशनच्या पलीकडे, ही परिषद अस्थिर जागतिक आणि देशांतर्गत परिस्थिती, धोरणातील महत्त्वाचे बदल, विकसित होत असलेले व्यापार गतिशीलता आणि उद्योगाला आकार देणाऱ्या आणि भारताच्या महत्त्वाकांक्षी स्टील वाढीच्या मार्गावर संवाद साधणाऱ्या शाश्वत पद्धतींची अत्यावश्यकता याबद्दल सखोल अंतर्दृष्टी प्रदान करण्याचा प्रयत्न करते.

संघटित स्क्रॅप खरेदी सक्षम करणाऱ्यासाठी एमजंक्शनचा पुढाकार

दोन दशकांहून अधिक काळ,एमजंक्शन हे ऑटो ओईएम, ईपीसी साइट्स, पी अँड एम युनिट्स आणि विविध औद्योगिक स्त्रोतांकडून साहित्य हाताळणारे संघटित भंगार व्यापारात आघाडीचे खेळाडू आहे. नोंदणीकृत वाहन भंगार सुविधा (आरव्हीएसएफ) कडून विक्री सुलभ करण्यात अग्रणी म्हणून, एमजंक्शन गेल्या सहा वर्षांपासून संघटित खरेदीदारांसाठी सक्रियपणे भंगार सोर्स करत आहे, असे कंपनीचे कार्यकारी संचालक वर्मा म्हणाले आहेत.

मागणी आणि पुरवठ्यातील अंतर भरून काढण्यासाठी, एमजंक्शनने भंगार खरेदी व्यावसायिकांच्या अनुभवी टीमद्वारे समर्थित एआय-चालित डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला आहे. हे प्लॅटफॉर्म पर्यावरणीय, कायदेशीर आणि व्यावसायिक मानकांचे पालन सुनिश्चित करताना खरेदीदारांना संरचित (Structural) बाजारपेठ प्रवेश प्रदान करते. कंपनीने,नेटवर्क वाढवण्यासाठी आणि विश्वासार्हता मजबूत करणाऱ्या २५०+ हून अधिक जीएसटी-अनुपालन (GST Complaince) पुरवठादारांना १२०+ ठिकाणी ऑनबोर्ड केले आहे ज्यामुळे नेटवर्कची पोहोच आणि विश्वासार्हता मजबूत झाली आहे' असा दावा पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे.

कंपनीच्या प्रदर्शनातील स्थित्यंतराविषयी भाष्य करताना,'गेल्या तीन वर्षांत एमजंक्शनने १५ राज्यांमधील प्रमुख एकात्मिक स्टील प्लांट्स (ISPs) ला १.२ दशलक्ष टन भंगार वितरित केले आहे. त्यांनी ३७००० पेक्षा अधिक वाहने आणि ६४ पेक्षा अधिक रेल्वे रॅकसाठी लॉजिस्टिक्स व्यवस्थापित केले आहेत ज्यामुळे एंड-टू-एंड समन्वय सुनिश्चित होतो 'असे वर्मा बोलताना म्हणाले.

एमजंक्शन सर्व्हिसेस लिमिटेड, टाटा स्टील आणि सेल यांच्यातील ५०:५० संयुक्त उपक्रम, ही भारतातील मोठी B2B ई-कॉमर्स कंपनी आहे, जी दोन दशकांहून अधिक काळ उद्योगांमध्ये मूल्य निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करते. प्रामुख्याने कंपनी कोळशाच्या ऑनलाईन खरेदी विक्रीत कार्यरत आहे. २००१ मध्ये स्टील विक्रीत पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणण्यासाठी त्याच्या मेटलजंक्शन प्लॅटफॉर्मच्या लाँचसह स्थापन झालेल्या एमजंक्शनने तेव्हापासून अनेक क्षेत्रांमध्ये आपल्या सेवांमध्ये विविधता आणली ज्यामध्ये ई-लिलाव, ई-खरेदी, लॉयल्टी सोल्यूशन्स, ई-मार्केटप्लेस, कृषी-वस्तू, वित्तपुरवठा आणि विशेष सेवांचा समावेश असलेला व्यापक पोर्टफोलिओ आहे.

लॉयल्टी मॅनेजमेंटसाठी mjGRO सारख्या नाविन्यपूर्ण ऑफरसह, 'mjunction' सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही क्षेत्रातील १४० हून अधिक मार्की क्लायंटना सेवा देते. आर्थिक वर्ष २५ मध्ये ३२४ कोटी रुपये ऑपरेटिंग महसूल आणि ७१.५३ कोटी रुपये एकत्रित करोत्तर नफा (PAT) नोंदवत आहे, ज्यामुळे तिच्या प्रवर्तकांना सातत्यपूर्ण लाभांश मिळत आहे. नुकतेच कंपनीने आपले नवीन अँप देखील लाँच केले आहे. कंपनीने २५ व्या वर्षात पदार्पण केल्याने स्टील उद्योगातील परामर्ष जाणून घेण्यासाठी व या उद्योगातील दिग्गजांचे विचार जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी भारतीय स्टील कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >