दोडामार्ग : जिद्द, मेहनत आणि आरोग्यदायी जीवनशैलीच्या बळावर कोणतीही गोष्ट अशक्य नसते, हे सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील डॉ. अरुण सरडे यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. गोव्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या ७०.३ गोवा आयर्नमॅन स्पर्धेत वयाच्या ६५ व्या वर्षी डॉ. सरडे यांनी आष्टा नगरीतील पहिले 'आयर्नमॅन' होण्याचा ऐतिहासिक बहुमान पटकावला आहे. या अत्यंत खडतर मानल्या जाणाऱ्या स्पर्धेत स्पर्धकांना सलग ८.३० तासांच्या निर्धारित वेळेत तीन टप्पे पूर्ण करायचे होते.
१.९ किमी पोहणे, ९० किमी सायकलिंग,२१.१ किमी धावणे हे तिन्ही टप्पे डॉ. सरडे यांनी केवळ ७ तास ४९ मिनिटे या विक्रमी वेळेत पूर्ण करून आपली शारीरिक क्षमता आणि मानसिक कणखरता सिद्ध केली. डॉ. सरडे यांच्या या कामगिरीमुळे सांगली जिल्हा सह आष्टा शहराची मान अभिमानाने उंचावली आहे. त्यांनी ६०-६५ वयोगटात जागतिक स्तरावर ५वा क्रमांक पटकावला, तर याच वयोगटातील भारतीय स्पर्धकांमध्ये दुसरा क्रमांक मिळवून देशाचे प्रतिनिधित्व केले.
मुंबई (खास प्रतिनिधी): नुकत्याच पार पडलेल्या शासकीय क्रीडा स्पर्धांमध्ये महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी कुस्ती, मल्लखांब खेळांमध्ये ...






