मुंबई : बॉलिवूडची ग्लोबल आयकॉन अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आता तिच्या आगामी आणि बहुप्रतिक्षित चित्रपटामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दिग्दर्शक एस.एस. राजामौली (S.S. Rajamouli) यांच्या पॅन-इंडिया स्तरावरील 'ग्लोबट्रॉटर' (Globetrotter) या भव्य ॲक्शन-ॲडव्हेंचर चित्रपटाचा फर्स्ट पोस्टर (First Poster) नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातून प्रियंका चोप्रा दक्षिणेकडील सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) सोबत धमाकेदार पुनरागमन करण्यास सज्ज झाली आहे. बाहुबली आणि RRR सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणाऱ्या राजामौलींच्या या चित्रपटाची प्रेक्षक दीर्घकाळापासून आतुरतेने वाट पाहत होते. दिग्दर्शकांनी जेव्हा या ॲक्शन-ॲडव्हेंचर चित्रपटाचा जबरदस्त फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला, तेव्हा चाहत्यांमध्ये एकच उत्साह संचारला. विशेषतः, या पोस्टरमधील प्रियंका चोप्राचा लूक सर्वांच्या नजरा खिळवून ठेवणारा आणि लक्षवेधी ठरत आहे. एस.एस. राजामौली, महेश बाबू आणि प्रियंका चोप्रा हे त्रिकूट एकत्र आल्यामुळे 'ग्लोबट्रॉटर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठे रेकॉर्ड करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नवी दिल्ली : लाल किल्ला परिसरातील बॉम्बस्फोट प्रकरणाची चौकशी जसजशी पुढे सरकत आहे, तसतसे नवनवीन आणि धक्कादायक तपशील समोर येत आहेत. गुप्तचर विभागाच्या ...
एस.एस. राजामौलींकडून देशी गर्लचं भव्य स्वागत; "देसी गर्ल, वेलकम बॅक!"
१२ नोव्हेंबर २०२५ रोजी, दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय सिने दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर प्रियंका चोप्राचा 'ग्लोबट्रॉटर' फर्स्ट लूक पोस्टर शेअर करत तिचे स्वागत केले. त्यांनी आपल्या कॅप्शनमध्ये प्रियंका चोप्राचे महत्त्व अधोरेखित केले की, "ही ती महिला आहे जिने भारतीय सिनेमाला जागतिक स्तरावर नवा आयाम दिला. देसी गर्ल, वेलकम बॅक! जगाला तुझ्या मंदाकिनीचे असंख्य रंग पाहायची आतुरता आहे." राजामौली यांनी प्रियंकाचे कौतुक करताना, तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय सिनेमाला दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला. त्यांच्या या भावनिक आणि उत्साहवर्धक कॅप्शनमुळे 'ग्लोबट्रॉटर' चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
पिवळी साडी, कोल्हापुरी आणि हातात बंदूक
आपला फर्स्ट लूक शेअर करताना प्रियंका चोप्राने एक भन्नाट कॅप्शन लिहिले आहे. आपल्या भूमिकेची ओळख करून देताना ती म्हणते, "ती दिसते त्यापेक्षा कितीतरी अधिक आहे... मंदाकिनीला हॅलो म्हणा." यावरून प्रियंका 'मंदाकिनी' नावाचे पात्र साकारत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोस्टरमध्ये प्रियंकाचा लूक अत्यंत खास आणि आकर्षक आहे. 'देसी गर्ल' प्रियंका पिवळ्या रंगाची साडी नेसलेली, पायात कोल्हापुरी चप्पल घातलेली दिसत आहे. या लूकचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे तिचा ॲक्शन मोड. पारंपरिक वेशात असूनही ती हातात बंदूक घेऊन अत्यंत गंभीर आणि दमदार अंदाजात उभी आहे. साडी आणि ॲक्शनचा हा अनोखा संगम प्रेक्षकांना नक्कीच भावेल, अशी अपेक्षा आहे.
बॉलिवूडकरांनाही 'मंदाकिनी'ची प्रतीक्षा
प्रियंकाच्या या पोस्टवर अनेक आघाडीच्या कलाकारांनी कमेंट करत तिचे आणि तिच्या भूमिकेचे कौतुक केले आहे, प्रियंकाचा 'गुंडे' चित्रपटातील को-स्टार असलेल्या रणवीर सिंहने या लूकचे कौतुक करत लिहिले, "व्हेरी कूल!" म्हंटलंय. अभिनेता आर. माधवन देखील प्रियंकाच्या या लूकवर फिदा झाला. त्याने कमेंट केली की, "काय लूक आणि काय इम्पॅक्ट आहे!" याशिवाय, अभिनेत्री भूमी पेडणेकर सह अनेक सेलिब्रिटींनी 'देसी गर्ल'च्या या ॲक्शन अवताराचे कौतुक केले आहे. या प्रतिक्रिया पाहता, बॉलिवूडकरांनाही एस.एस. राजामौली यांच्या या पॅन-इंडिया चित्रपटाची मोठी उत्सुकता लागून राहिली आहे, हे स्पष्ट होते.
'RRR' नंतर राजामौलींचा सर्वात मोठा प्रोजेक्ट
'बाहुबली' आणि 'RRR' सारखे जागतिक स्तरावर यशस्वी चित्रपट देणारे दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांचा आगामी चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटसृष्टीत चर्चेचा विषय ठरला आहे. 'RRR' च्या प्रचंड यशानंतर राजामौलींचा हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा आणि महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट मानला जात आहे. अद्याप या चित्रपटाचे अधिकृत नाव जाहीर करण्यात आलेले नाही. सध्या हा चित्रपट 'SSMB२९' या नावाने ओळखला जात आहे (महेश बाबूचा २९ वा चित्रपट). चाहत्यांमध्ये या चित्रपटाच्या नावाविषयी कमालीची उत्सुकता आहे. ही उत्सुकता आता लवकरच संपणार आहे. १५ नोव्हेंबर २०२५ रोजी हैदराबाद येथे एका भव्य लॉन्च इव्हेंटचे आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमात या चित्रपटाचे अधिकृत नाव (Official Title) जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. प्रियंका चोप्रा आणि महेश बाबू यांच्यासारखे कलाकार या चित्रपटात असल्यामुळे, राजामौलींचा हा 'ग्लोबट्रॉटर' प्रोजेक्ट बॉक्स ऑफिसवर मोठे विक्रम करेल, अशी अपेक्षा आहे.






