Thursday, November 13, 2025

मुंबईतील अनधिकृत बांधकामांसाठी तक्रारींसाठी डॅशबोर्ड, महापालिकेने संस्थेची केली नेमणूक

मुंबईतील अनधिकृत बांधकामांसाठी तक्रारींसाठी डॅशबोर्ड,  महापालिकेने संस्थेची केली नेमणूक

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईतील अतिक्रमण हटवण्यासाठी आता महापालिकेच्यावतीने ट्रॅकींग सिस्टीम राबवण्यात येणार आहे. यापूर्वी बनवलेल्या प्रणालीमध्ये आता मोठ्याप्रमाणात बदल करण्यात आला असून यासाठी डॅशबोर्ड तयार करण्यात आला आहे. यासाठी आर्सियस इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड यांची निवड करण्यात आली आहे. यासाठी सुमारे साडेचार कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना आता या डॅशबोर्डच्या माध्यमातून अतिक्रमणांच्या तक्रारी करता येणार असून यासर्व प्रकारच्या तक्रारींचे निवारण या डॅशबोर्ड माध्यमातून होणार असल्याने प्रत्येक अधिकारी या तक्रारींसाठी बांधिल राहणार आहे.

मुंबई महापालिकेने ई शासन उपक्रमांतर्गत फेब्रुवारी २०१६ मध्ये अतिक्रमण हटवण्यासाठी ट्रॅकींग आणि व्यवस्थापन प्रणालीला सुरुवात केली. पण या प्रणालीमार्फत नागरिकांना अनधिकृत बांधकामांसंदर्भात तक्रार करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते.तसेच माहपालिकेचे अभियंते आणि कर्मचारी यांच्या मार्फत या तक्रारींचे निवारण करण्यासाठीची सोय उपलब्ध केली गेली. परंतु ही प्रणाली कालबाह्य झाल्याने याचा वापर करणाऱ्या नागरिकांना विविध समस्या येत आहे. या प्रणालीमध्ये उद्भवणाऱ्या विविध त्रुटींमुळे नवीन प्रणाली विकसित करण्याचा निर्णय अतिक्रमण विभागाने घेतला.

सध्याच्या प्रणालीमध्ये जीआयएस व्हिज्युअलायझेशन, अॅनालिटिक्स, डॅशबोर्ड यांची कमतरता आहे. ही प्रणाली कालबाह्य झाल्याने या प्रणालीमध्ये आधुनिक सुधारणा करण्याचा निर्णय अतिक्रमण निर्मुलन विभागाने घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना अतिक्रमणांच्या तक्रारी करण्यासाठी डॅशबोर्डची सुविधा असावी याकरता अतिक्रमण विभाग आणि माहिती व तंत्रज्ञान विभागाच्यावतीने या प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी सल्लागाराच्या मदतीने संस्थेची निवड केली आहे. या निवड केलेल्या संस्थेच्या माध्यमातून अतिक्रमण हटवण्यासाठी ट्रॅकींग आणि व्यवस्थापन प्रणाली वेब आणि मोबाईल ऍप्लिकेशनचे डिझाईन, विकास, चाचणी आणि गो लाईव्हचा वापर केला जाणार आहे. आरईटीएमएस प्रणालीचे इतर प्रणालींसोबत इंटिग्रेशन करणे, तीन वर्षांच्या करार कालावधीसाठी वापरकर्त्यांचे प्रशिक्षण, तसेच क्लाऊड होस्टिंग समर्थन, तांत्रिक मनुष्यबळ पुरवणे आदी प्रकारणी कामे केली जाणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा