Thursday, November 13, 2025

दिल्ली स्फोट तपासात मोठे यश! ड्रायव्हर डॉ. उमर नबी असल्याचे डीएनए तपासातून स्पष्ट

दिल्ली स्फोट तपासात मोठे यश! ड्रायव्हर डॉ. उमर नबी असल्याचे डीएनए तपासातून स्पष्ट

नवी दिल्ली: दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटामधील तपासात मोठे यश मिळाले आहे. या भीषण स्फोटात गाडी चालवणारा मुख्य आरोपी डॉ. उमर नबी हा गाडीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गाडीतील स्फोट कोणी घडवला? स्फोट झाला तेव्हा गाडी कोण चालवत होतं? यासारख्या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी ओळख न पटलेल्या मृतदेहाची डीएनए चाचणी करण्यात आली. ज्यामध्ये हे स्पष्ट झाले आहे की, हा स्फोट डॉ. उमर नबी यानेच केला होता.

डॉ. उमर स्वतः कार चालवत घटनास्थळी आला आणि त्यानेच कारबॉम्बचा स्फोट घडवून आला. स्फोटावेळी पाय स्टीअरिंग व्हील आणि अ‍ॅक्सिलरेटरमध्ये अडकल्यामुळे डॉ. उमरचा मृतदेह घटनास्थळावर लगेच सापडला होता. या मृतदेहाची डीएनए चाचणी करण्यात आली. यासाठी उमरच्या पुलवामाच्या घरातून त्याच्या आईचे डीएनए नमुने संकलित करण्यात आले आणि पडताळणी करण्यात आली. उमरच्या आईचे डीएनए हे घटनास्थळावरील मृतदेहाशी जुळले आणि डॉ. उमरच्या मृतदेहाची ओळख पटली. तसेच डॉ. उमरने स्वतः कारबॉम्बचा स्फोट केल्याचेही उघड झाले.

सीसीटीव्ही फूटेज आणि डीएनए पुराव्यांच्या मदतीने पोलिसांना आता वेगाने तपास करणे शक्य होणार आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. ज्यामध्ये केंद्र सरकारने लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाला दहशतवादी घटना घोषित करत शोक व्यक्त केला. तसेच भारताची दहशतवाद विरोधी भूमिका कायम असल्याचे जाहीर केले.

Comments
Add Comment