Thursday, November 13, 2025

बँक निफ्टीत रेकॉर्ड ब्रेक वाढ! ५८६१५.२० पातळीही ओलांडली 'या' कारणांमुळे

बँक निफ्टीत रेकॉर्ड ब्रेक वाढ! ५८६१५.२० पातळीही ओलांडली 'या' कारणांमुळे

मोहित सोमण: बँक निफ्टीने आज रेकॉर्डब्रेक पातळी दुपारी ओलांडली आहे. दुपारी ३.२१ वाजेपर्यंत बँक निफ्टीने आज ५८६१५.२० पातळी ओलांडली असल्याने बाजारातील बँकेतील तेजी आज खऱ्या अर्थाने अधोरेखित झाली. मोठ्या बँकासह मध्यम व लहान बँकातील क्रेडिट ग्रोथसह निव्वळ नफ्यात झालेल्या वाढीमुळे आज बाजाराने खुल्या दिल्याने बँक निफ्टीला समर्थन दिले होते. याशिवाय बँकेच्या असेट क्वालिटीत सुधारणा झाल्याने बँकेच्या गुंतवणूकीत गुंतवणूकदारांचा विश्वास वाढल्याचे जाणवत आहे. मात्र यंदा वाढत्या तरतूदी (Provisioning) नुसार काही प्रमाणात बँकेचा चढता नफा मर्यादित पातळीवर राहिला आहे हे देखील तितकेच खरे आहे. खाजगी सरकारी दोन्ही बँकेच्या असेट क्वालिटीत यंदा वाढ झाली आहे.

तसेच तमाम बँकेच्या बुक व्हॅल्यूत वाढ होताना कर्ज वाटपातपण खोऱ्याने वाढ झाली आहे. याखेरीज आज बँक निफ्टीत दुपारी ०.५७% म्हणजेच जवळपास १% वाढ झाल्याने निर्देशांकाने ही कामगिरी बजावली आहे. आज दिवसभरात ५८१२७.१० पातळीवर बँक निफ्टीने निचांक (Low) नोंदवला असून ५८६१५.९५ हा उच्चांक (High) नोंदवला आहे. काल निफ्टी ५८२७४.६५ पातळीवर बंद झाला होता.

पहिल्या तिमाहीतील तुलनेत दुसऱ्या तिमाहीत बँकांनी अपेक्षेपेक्षा बराच जास्त नफा नोंदवला आहे,वाढता कर्ज पुरवठा, घटते कर्ज वितरणातील खर्च आणि सुधारित कार्यक्षमता गुणोत्तर (Efficiency Ratio) सुधारणा झाली आहे. एसबीआय,एचडीएफसी सारख्या बड्या अनेक मोठ्या कर्जदात्यांकडून शुल्क उत्पन्न वाढ आणि खर्च नियंत्रणातही चांगली आकडेवारी अधोरेखित झाली आहे. बँकेच्या उत्पन्नातही वाढ झाली असून नुकत्याच घोषित केलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमधील ग्राहक किंमत निर्देशांक(CPI) चलनवाढ विक्रमी नीचांकी पातळीवर आली आहे ज्यामुळे येत्या तिमाहीत डिसेंबर महिन्यात व्याजदर कपातीची अपेक्षा युएससह भारतीय बाजारातही वाढली आहे. जर रेपो दरात ५० बेसिस पूर्णांकाने कपात झाल्यास मोठ्या प्रमाणात बाजारात तरलता प्रस्थापित होइल याशिवाय मोठ्या प्रमाणात कर्जाची मागणी वाढू शकते ज्यामुळे हे वातावरण बँकांसाठी अनुकूल असू शकते.

सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत अनेक बँकांनी एनआयएम (Net Interest Margin NIM) वर सकारात्मकता दर्शविली आहे. याखेरीज बँकिंग अधिनियमात सरकारने सुधारणा केल्याने वित्तीय बाजारात पतधोरणात आणखी सुधारणा होऊ शकते ज्याचा फायदा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष फायदा बँकांना अपेक्षित असून बँकेच्या नफ्यात आणखी सुधारणा होऊ शकते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >