पुणे: कळंब-निमसाखर मार्गावर एका व्यक्तीचा गुडघ्यापासून तोडलेला पाय सापडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हा प्रकार इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर हद्दीत राज्यमार्गाच्या साईडपट्टीवर उघडकीस आला. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी उरलेले शरीर शोधण्यासाठी परिसरात शोधमोहीम सुरू केली असून हा पाय साधारण ४५ ते ५० वयोगटातील पुरुषाचा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच पायात पांढरा सॉक्स होता आणि परिसरात साखरेचे रिकामे पोतेही आढळून आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार, १२ नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वाआठ वाजताच्या सुमारास वालचंदनगर पोलीस स्टेशनला रस्त्यात पाय आढळून आल्याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच, वालचंदनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिथे त्यांना गुडघ्यापासून तोडलेला पाय दिसला. या तोडलेल्या पायाच्या काही अंतरावर ५० किलो क्षमतेचे साखरेचे रिकामे प्लास्टिक पोते आढळले. या प्रकरणी वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली.
नवी दिल्ली: दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटामधील तपासात मोठे यश मिळाले आहे. या भीषण स्फोटात गाडी चालवणारा मुख्य आरोपी डॉ. ...






