प्रतिनिधी:आज मोतीलाल ओसवालने फंडामेंटल व टेक्निकल पोझिशनआधारे आपल्या अहवालातून काही शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेजने नक्की कुठले शेअर म्हटले आहेत बघूयात यादी पुढीलप्रमाणे -
१) टाटा पॉवर- मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजने टाटा पॉवर शेअरला बाय कॉल दिला असून हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला गुंतवणूकदारांना दिला आहे. ३९६ रूपये खरेदी किंमतीसह (CMP) ५०० रूपयांची लक्ष्य किंमत (Target Price TP) गुंतवणूकदारांना दिली आहे.
२) जिंदाल स्टेनलेस- जिंदाल स्टेनलेस कंपनीच्या शेअरला मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेस (ब्रोकरेज) कंपनीने बाय कॉल दिला असून ७४३ रूपये प्रति शेअर खरेदी किंमतीसह (CMP) खरेदीचा सल्ला दिला असून ८७० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत ब्रोकरेजने दिली आहे.
३) सायरमा एसजीएस टेक्नॉलॉजी- कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ८३१ रुपये प्रति शेअर खरेदी किंमतीसह हा बाय कॉल दिला आहे. ब्रोकरेजकडून लक्ष्य किंमत ९६० रूपये प्रति शेअर देण्यात आली आहे.
४) जीपी इन्फ्राप्रोजेक्ट- कंपनीच्या शेअरला मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजकडून बाय कॉल दिला आहे. ११३५ रुपये प्रति शेअर खरेदी किंमतीसह खरेदीचा सल्ला दिला आहे. तसेच शेअरची लक्ष्य किंमत १३६० रूपये प्रति शेअर देण्यात आली आहे.
५) वी मार्ट रिटेल- कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ७७० रूपये प्रति शेअर खरेदी किंमतीसह खरेदीचा सल्ला दिला आहे. तसेच लक्ष्य किंमत कंपनीने १०८५ रूपये प्रति शेअर दिलेली आहे.






