Wednesday, November 12, 2025

Tata Motors Demerger: टाटा मोटर्स कर्मशिअल व्हेईकल कंपनी शेअर बाजारात २८% अधिक प्रिमियम दरात सूचीबद्ध

Tata Motors Demerger: टाटा मोटर्स कर्मशिअल व्हेईकल कंपनी शेअर बाजारात २८% अधिक प्रिमियम दरात सूचीबद्ध

मोहित सोमण: १ ऑक्टोबरपासून लागू झालेल्या टाटा मोटर्सच्या चर्चित डिमर्जर टाटा मोटर्स कर्मशिअल व्हेईकल कंपनीच्या शेअरचा बाजारात प्रारंभ झाला आहे. आज हा टाटा मोटर्सचा शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. हा शेअर मूळ किंमतीपेक्षा २८% प्रिमियम दरासह बाजारात ३३५ रूपये प्रति सूचीबद्ध (Listed) झाला आहे. आज १२ नोव्हेंबरपासून हा बाजारात सूचीबद्ध झाल्याने टाटा मोटर्सच्या नव्याने स्थापित झालेल्या टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल (TMPV) व टाटा मोटर्स कर्मशिअल व्हेईकल (TMCV) या दोन्ही शेअर बाजारात कार्यरत झालेले आहेत. यापूर्वी टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकलचा शेअर १४ ऑक्टोबरला बाजारात सूचीबद्ध झाला होता.

सकाळी सत्र सुरूवातील टाटा मोटर्स कर्मशिअल व्हेईकलचा शेअर एनएसईत ३३५ रूपयांवर सूचीबद्ध झाला आहे. मूळ किंमत असलेल्या २६०.७५ रूपये प्रति शेअर तुलनेत हा शेअर ३३५ रूपयांवर सूचीबद्ध झाला आहे. ३६८ कोटी इक्विटी शेअर्सची बाजारात विक्री करण्यात आली होती. डिमर्जर या २ रूपयांच्या दर्शनी मूल्याप्रमाणे (Face Value) हे शेअर विकले जात आहेत. यापूर्वी सूचीबद्ध झालेला टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकलचा शेअर ४०० रूपयांवर बाजारात सूचीबद्ध झाला होता. एकूण डिमर्जर प्रकियेनंतर गर्भित मूल्य २६० ते २७० रूपयांवर अपेक्षित होते मात्र हा शेअर प्रिमियमसह ४०० रूपयांवर सूचीबद्ध झाला होता.

टाटा कर्मशिअल व्हेईकलमध्ये व्यवसायिक गाड्यांचा समावेश असेल. ट्रक, बस, लॉजिस्टिक्स, व इतर संबंधित व्यवसायी वाहनांचा समावेश होतो. तर प्रवासी वाहनात प्रामुख्याने प्रवासी गाड्या, ईव्ही कार, व इतर इतर संबंधित गाड्यांचा समावेश होतो. या डिमर्जर योजनेत (Scheme of Arrangement) टाटा मोटर्सच्या भागभांडवलधारकांना दोन्ही शेअरचे २ रूपये दर्शनी मूल्याप्रमाणे दोन स्वतंत्र शेअर वाटप करण्यात आले होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >