मोहित सोमण:६६३२ कोटी रूपये बूक व्हॅल्यु असलेला आयपीओ आज अखेर बाजारात सूचीबद्ध झाला आहे. शेअर बाजारात सूचीबद्ध होताच १४% प्रिमियम दरासह बाजारात सूचीबद्ध झाला आहे. मुळ किंमत (Price Band) असलेल्या १०० तुलनेत हा शेअर ११४ रूपयांवर बाजारात सूचीबद्ध झाला आहे. सकाळी १०.४३ वाजता कंपनीचा शेअर ९.७६% प्रिमियम दरासह १२२.९३ रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे. बीएसई (Bombay Stock Exchange BSE), एनएसई (National Stock Exchange NSE) बाजारात शेअर आज सूचीबद्ध झाला. तसेच जीएमपी (Grey Market Price GMP) भाकीतालाही मागे टाकत शेअरने चांगली कामगिरी केली आहे. ओरक्ला फूडस व लेन्सकार्ट आयपीओचा खराब लिस्टिंगनंतर ग्रो (Billionbrains Garage Ventures) कंपनीच्या शेअरला पहिल्या दिवशी बाजारात उदंड प्रतिसाद मिळाला आहे. सूचीबद्ध होण्यापूर्वी शेवटची जीएमपी ५ रुपये प्रिमियम रूपये होती मात्र १४%, १२% प्रिमियमसह शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्याने गुंतवणूकदारांसाठी आयपीओत हा नवा आशेचा किरण उगवला आहे.
४ ते ७ नोव्हेंबर कालावधीत हा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुला झाला होता. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १५००० रुपयांची गुंतवणूक अनिवार्य करण्यात आली होती. एकूण ६६३२३००५१ शेअरपैकी ४९७४२२५३८ म्हणजे जवळजवळ ७५% शेअर पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIB) व १९८९६९०१५ शेअर म्हणजेच जवळपास ३०% शेअर हे एक्स अँकर गुंतवणूकदारांसाठी व विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) ६६३२३००५ शेअर (१०%), व किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (Retail Investors) ६६३२३००५ (१०%) शेअर राखीव ठेवण्यात आले होते. तसेच अँकर गुंतवणूकदारांकडून कंपनीने आयपीओआधी २९८४.५४ कोटींची गुंतवणूक प्राप्त केली होती.
उपलब्ध माहितीनुसार, एकूण आयपीओला १७.६० पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. त्यापैकी किरकोळ गुंतवणूकदारांकडून ९.४३ पटीने, २२.०२ पटीने पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून, व विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून १४.२० पटीने सबस्क्रिप्शन मिळाले होते.
२०१७ मध्ये स्थापन झालेली ग्रोव ही बेंगळुरूस्थित एक फिनटेक कंपनी आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना फायनांशियल डिजिटल गुंतवणूक सेवा व प्लॅटफॉर्म पुरवते. ग्राहकांना अनेक वित्तीय उत्पादने आणि सेवांद्वारे संपत्ती निर्मितीच्या (Wealth Creation) संधी प्रदान करते. कंपनी म्युच्युअल फंड, स्टॉक, एफ अँड ओ, ईटीएफ, आयपीओ, डिजिटल सोने आणि यूएस स्टॉकमध्ये गुंतवणूक अशा विविध सेवा ग्राहकांना ऑफर करते. तिचे मोबाइल अँप म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांमध्ये विशेषतः लोकप्रिय आहे.माहितीप्रमाणे, ग्रोव मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी (एमटीएफ), अल्गोरिदमिक ट्रेडिंग, न्यू फंड ऑफर (एनएफओ) आणि क्रेडिट सोल्यूशन्स सारख्या मूल्यवर्धित सेवा देखील प्रदान करते.
कंपनीला यापूर्वी इयर ऑन इयर बेसिसवर ४५% अधिक महसूल मिळाला असून इयर बेसिसवर कंपनीच्या करोत्तर नफ्यात (PAT) ३२७% वाढ झाली होती. कंपनीच्या उत्पन्न मात्र गेल्या तिमाहीतील ४०६१.६४ कोटी तुलनेत या तिमाहीत (तिमाही बेसिसवर) ९४७.४७ कोटींवर घसरले होते तर ईबीटा (EBITDA) मध्ये महिना आधारे (MoM) २३६१.०१ कोटीवरून ४१८.७५ कोटीवर घसरण झाली होती.






