Wednesday, November 12, 2025

गोविंदाला 'चक्कर'! व्यायामामुळे थकवा, रुग्णालयातून डिस्चार्ज

गोविंदाला 'चक्कर'! व्यायामामुळे थकवा, रुग्णालयातून डिस्चार्ज

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते गोविंदा यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे दाखल करण्यात आलेल्या मुंबईतील क्रिटीकेअर रुग्णालयातून बुधवारी सकाळी डिस्चार्ज देण्यात आला आहे. चक्कर येणे आणि काही काळासाठी शुद्ध हरपल्यामुळे त्यांना दाखल करण्यात आले होते.

रुग्णालयातून बाहेर पडताना ६१ वर्षीय गोविंदा यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि ही घटना जास्त व्यायामामुळे झाल्याचे सांगितले.

आता ते योगा आणि श्वासोच्छ्वास यावर लक्ष केंद्रित करतील आणि तीव्र जीम प्रशिक्षणाऐवजी शारीरिक हालचालींमध्ये संयम महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment