मोहित सोमण: युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इंडियावर 'कदाचित टॅरिफ कमी करू' अशी मोघम प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे. प्रामुख्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे सर्जियो गोर यांनी भारत व युएस यांच्यातील नवनिर्वाचित राजदूत म्हणून शपथ घेतली. या शपथविधी दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. 'भारतावरील माल आयातीवर (Goods Import) आधारित टॅरिफ वॉशिंग्टन कमी करेल' अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी बोलताना दिली. प्रामुख्याने रशियाकडून मोठ्या प्रमाणात भारत कच्चे तेल खरेदी करत होता त्यामुळे आम्ही कर लावला परंतु आता त्यांनी क्रूडची आयात रशियाकडून कमी केल्याने आम्ही टॅरिफ कमी करु' अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना यावेळी दिली.
केपलर या युएस रिसर्च संस्थेच्या मते, रशियन तेलाची आयात ऑक्टोबर महिन्यात बदललेली नाही. प्रति दिनी १.५९ दशलक्ष बॅरेल इतकी तेलाची आयात भारताने केली आहे. कारण भारताचा रशियाशी संपर्क सुरूच आहे. या आठवड्यात २० भारतीय कंपन्यांच्या शिष्टमंडळाने या वर्षीच्या मॉस्को इंटरनॅशनल टूल एक्स्पोमध्ये भाग घेतला आहे. ती भारताच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी संस्था फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन (FIEO) संबंधित आहे.दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की,'गोर यांच्या प्राधान्यांमध्ये अमेरिकेच्या प्रमुख उद्योगांमध्ये गुंतवणूक वाढवणे, अमेरिकन ऊर्जा निर्यात वाढवणे आणि सुरक्षा सहकार्य वाढवणे यांचा समावेश असेल.'
'मी सर्जिओकडे सर्वात महत्त्वाच्या संबंधांपैकी एक मजबूत करण्यासाठी पाहत आहे आणि ते म्हणजे भारत प्रजासत्ताकासोबतची धोरणात्मक भागीदारी' असे ट्रम्प म्हणाले आहेत.
इंडियन ब्रँड इक्विटी फाउंडेशनच्या मते, भारताने २०२५ च्या आर्थिक वर्षात रशियाला $४.८७ अब्ज निर्यात केली आणि $६३.८४ अब्ज आयात केली. याउलट अमेरिकेने भारताच्या निर्यातीपैकी १८% निर्यात केली, तर रशियासाठी फक्त १% निर्यात केली असे ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या हर्मन म्हणाले. अधिक थेट संवाद साधण्याच्या व्हाईट हाऊसच्या प्रयत्नांचे प्रतिनिधित्व गोर करतात असे तज्ञांचे मत आहे. तज्ञांच्या मते अलिकडच्या काही महिन्यांत नवी दिल्ली आणि वॉशिंग्टनमधील धोरणात्मक संबंध बिघडवणारे मुद्दे म्हणजे वाढीव शुल्क, H1B व्हिसासाठी १००००० $ शुल्क आणि भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीसाठी ट्रम्प यांचे वारंवार केलेले दावे आहेत.
जर अमेरिका भारताबाबतच्या व्यवहारात्मक दृष्टिकोनावर कायम राहिली तर ते दोघांना आणखी दूर करेल आणि दोघांच्याही धोरणात्मक हितसंबंधांना तडजोड करेल असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. ट्रम्प धोरण भारताला रशिया, ग्लोबल साउथ आणि अगदी ची नकडे ढकलेल. हे भारत किंवा अमेरिकेच्या हिताचे ठरणार नाही असेही तज्ञांनी म्हटले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळातच ट्रम्प यांचा करपातीचा दावा खरा ठरेल का खोटा हा चर्चेचा विषय ठरला आहे. भारत व रशिया यांच्यातील संबंध चांगले असताना केवळ काही कंपन्यांनी तेल आयातीत कपात केली असली तरी अमेरिकेला भावी काळातील अपेक्षित रशियन तेल आयात कपात भारत करेल का? हा खरा कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या दाव्यात कितपत तथ्य आहे हे येणारा काळच ठरवू शकतो.






