Wednesday, November 12, 2025

धर्मेंद्र यांची कोट्यावधींची मालमत्ता! कोण होणार 'वारसदार'?

धर्मेंद्र यांची कोट्यावधींची मालमत्ता! कोण होणार 'वारसदार'?

मुंबई: अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांच्यावर घरी उरचार सुरू राहणार आहेत. धर्मेंद्र यांची प्रकृती जास्त बिघडल्याने त्यांच्या मृत्यूबाबत अनेक अफवा पसरवण्यात आल्या होत्या. मात्र, त्यांची मुलगी ईशा देओलने त्यांची प्रकृती स्थिर असून सुधारणा होत असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली. यामुळे अफवांना त्यांच्या कुटुंबीयांनीच पुर्णविराम दिला. दरम्यान त्यांच्या प्रकृतीबद्दल चर्चा सुरू असताना, त्यांच्या कोट्यवधींच्या मालमत्तेचा कायदेशीर वारसा हक्का कोणाला मिळणार यावर चर्चा सुरू आहेत.

धर्मेंद्र यांची एकूण संपत्ती अंदाजे ४०० ते ४५० कोटींच्या घरात आहे. यात त्यांच्या अभिनय कारकिर्दीतून मिळवलेला पैसा आणि मोठ्या प्रमाणात असलेली स्थावर मालमत्ता यांचा समावेश आहे. लोणावळ्यातील १०० एकरच्या जागेत असलेला फार्म हाऊस त्यांच्या मालमत्तेचा मोठा भाग आहे. याशिवाय 'विजयता फिल्म्स' ही प्रोडक्शन कंपनी आणि 'गरम धरम ढाबा' या रेस्टॉरंट्समधूनही त्यांना मोठी कमाई होते.

धर्मेंद्र यांनी दोन विवाह केल्यामुळे त्यांच्या एवढ्या संपत्तीवर कोणाचा हक्क असणार याच्या चर्चा जोरात सुरू आहेत. धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर जिवंत असताना आणि घटस्फोट न होता त्यांनी हेमा मालिनी यांच्याशी दुसरा विवाह केला. २०२३ च्या निर्णयानुसार, पहिली पत्नी जिवंत असताना केलेला दुसरा विवाह हिंदू विवाह कायद्यांतर्गत 'अवैध' मानला जातो. महत्त्वाचे म्हणजे वारस हक्क कायद्यावर हिंदू विवाह कायद्याचा प्रभाव आहे. त्यामुळे धर्मेंद्र यांच्या संपत्तीमध्ये दुसऱ्या पत्नीचा अधिकार असणार का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पहिल्या पत्नीच्या मुलांचा म्हणजे सनी, बॉबी, विजेता आणि अजिता यांचा वडिलांच्या स्व-अर्जित मालमत्तेवर पूर्ण आणि समान हक्क असेल. परंतु, वडिलोपार्जित संपत्तीवर मात्र त्यांना थेट अधिकार मिळत नाही. याउलट, हेमा मालिनी यांच्या मुली, ईशा आणि अहाना देओल यांना वडिलांच्या स्व-अर्जित मालमत्तेबरोबरच वडिलोपार्जित संपत्तीवर हक्क मिळेल. कायदेशीर भाषेत याला 'नोशनल पार्टिशन' म्हणतात. याचा अर्थ, वडिलोपार्जित मालमत्तेत धर्मेंद्र यांच्या वाट्याला आलेला हिस्सा त्यांच्या सर्व वारसांमध्ये म्हणजेच सहा अपत्यांमध्ये समान वाटला जाईल.

Comments
Add Comment