Wednesday, November 12, 2025

CPI Inflation Index: ग्राहक किंमत निर्देशांकांची सरकारी आकडेवारी जाहीर ऑक्टोबर महिन्यात 'ऐतिहासिक' घसरण जाणून घ्या 'आकडेवारी'

CPI Inflation Index: ग्राहक किंमत निर्देशांकांची सरकारी आकडेवारी जाहीर ऑक्टोबर महिन्यात 'ऐतिहासिक' घसरण जाणून घ्या 'आकडेवारी'

मोहित सोमण: सांख्यिकी व अंमलबजावणी मंत्रालयाने आज दिलेल्या माहितीनुसार, ग्राहक किंमत निर्देशांकात (Consumer Price Index CPI) ऑक्टोबर महिन्यात घसरण झाली आहे. प्रोविजनल आकडेवारीनुसार इयर ऑन इयर बेसिसवर निर्देशांकात ०.२५% घसरण झाली आहे. तर हेडलाईन इन्फ्लेशन (महागाईत) ऑक्टोबर महिन्यात ११९ बेसिस पूर्णांकाने घसरण झाली आहे. सप्टेंबर महिन्यातील तुलनेत महिना बेसिसवर ही घसरण नोंदवली गेली. या सांख्यिकी विभागाच्या माहितीनुसार सध्या घसरलेल्या सीपीआय सिरीजमधील ही सर्वाधिक 'ऐतिहासिक' घसरण मानली जात आहे.

माहितीनुसार अन्न महागाईतही (Food Inflation) इयर ऑन इयर बेसिसवर ५.०२% घसरण नोंदवली गेली आहे. मागील वर्षाच्या तिमाहीतील तुलनेत या तिमाहीत ही घसरण झाली ज्यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागात ४.८५%, शहरी भागात ५.१८% घसरण झाली.प्रामुख्याने आकडेवारीप्रमाणे, हेडलाईन महागाई व अन्न महागाई ही प्रामुख्याने जीएसटीतील दरकपात व बाजारातील अनुकुलन, तेल, भाजी, फळे, अंडी, पादत्राणे, डाळी, दळणवळण, संचार यांच्यातील घसरत्या किंमतीमुळे ग्राहक महागाई निर्देशांकात ही घसरण झाली आहे.

त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील महागाईत तिमाही बेसिसवर ०.२५% घसरण झाली असून हीच महागाई सप्टेंबर महिन्यात १.०७% घसरण झाली होती. शहरी भागातील माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यात १.८३% ऑक्टोबर महिन्यात ०.८८% घसरण झाली आहे.गृहनिर्माण क्षेत्रातील महागाई इयर ऑन इयर बेसिसवर २.९६% वर नोंदवली गेली आहे. याच प्रोव्हिजनल आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात ही महागाई २.९८% होती. याखेरीज शिक्षण क्षेत्रातील महागाईत महागाई दर अथवा निर्देशांकात ऑक्टोबर महिन्यात ३.४९% पातळीवर पोहोचला आहे. आरोग्याच्या बाबतीत, ऑक्टोबर महिन्यातील महागाई निर्देशांक ३.८६% पातळीवर स्थिरावला आहे. यापूर्वी गेल्या महिन्यात हा दर ४.३९% होता.

ऑक्टोबरमध्ये महागाईत घट झाल्यामुळे आरबीआयकडून पुन्हा दर कपात होण्याची शक्यता वाढली आहे.किरकोळ महागाईत घट ही २०२५ च्या सुरुवातीपासून आरबीआयने जाहीर केलेल्या १०० बेसिस पॉइंट दर कपातीचा परिणाम असल्याचे तज्ञांचेही मत आहे. महागाई कमी होण्यास जीएसटी दरांमध्ये कपात अनुकूल बेस इफेक्ट आणि अन्नधान्य चलनवाढ कमी होण्यास प्रमुख कारणीभूत ठरली आहे. तज्ञांच्या मते पुन्हा एकदा रेपो दरात ५० बेसिस पूर्णांकाने कपात होण्याची शक्यता आहे ज्यामध्ये बाजारात आणखी तरलता (Liquidity) वाढू शकते.अन्नधान्याच्या किमती कमी झाल्यामुळे सप्टेंबरमध्ये भारतातील किरकोळ महागाई १.५४% या अनेक वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचली होती. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाईत लक्षणीय घट झाल्याने त्यामुळेच डिसेंबरमध्ये पुन्हा रेपो दर कपातीची अपेक्षा वाढली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >