Wednesday, November 12, 2025

चीनची मोठी झेप! ऑनर आणणार जगातील पहिला AI Robot Phone, जाणून घ्या खास फीचर्स

चीनची मोठी झेप! ऑनर आणणार जगातील पहिला AI Robot Phone, जाणून घ्या खास फीचर्स

बीजिंग – तंत्रज्ञानाच्या विश्वात मोठा बदल घडवणारी बातमी चीनमधून समोर आली आहे. चीनची प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स कंपनी ‘ऑनर’ जगातील पहिला AI Robot Phone बाजारात आणणार आहे. या फोनमध्ये केवळ आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर असेल.

हा फोन 2026 मध्ये अधिकृतपणे लॉन्च होणार असून, ऑनरचे CEO ली जियान यांनी चीनमधील वुझेन शिखर परिषदेत याची घोषणा केली. कंपनीच्या मते, हा फोन AI च्या मदतीने काय शूट करायचे, कसे ट्रॅक करायचे आणि कोणत्या अँगल व्हिडिओ घ्यायचा हे स्वतः ठरवू शकेल.

या फोनची खासियत म्हणजे यामध्ये फोल्डिंग आणि लिफ्टिंग मशिनरी असेल. मागील कॅमेरा भाग वेगळा होऊन तो ‘गिंबल’ (Gimbal) मध्ये बदलू शकेल म्हणजेच 360 डिग्री फिरणारा, स्वयंचलित ट्रॅकिंग करणारा आणि 4K क्वालिटीमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करणारा कॅमेरा सिस्टम. हा फोन फक्त स्मार्टफोन नसून एक मिनी रोबोटप्रमाणे कार्य करेल.

ऑनरच्या अहवालानुसार, या फोनमध्ये एक मोठे AI मॉडेल असणार आहे जे भावना ओळखू शकेल, सभोवतालचे वातावरण समजू शकेल आणि घरातील इतर उपकरणांशी कनेक्ट होऊन त्यांचे नियंत्रण करू शकेल. यासाठी क्लाऊड सर्व्हरची गरज भासणार नाही सर्व काही थेट फोनमध्येच प्रोसेस होईल.

कंपनीने ‘अल्फा’ नावाचे धोरण मार्चमध्ये सुरू केले असून, पुढील पाच वर्षांत 10 अब्ज डॉलर्सचा गुंतवणूक करून AI आधारित स्मार्ट डिव्हाइस सिस्टीम विकसित करण्याची योजना आहे. या उपक्रमामुळे ऑनर आगामी काळात AI-आधारित उपकरणांच्या उत्पादनात मोठा खेळाडू ठरू शकतो.

बार्सिलोना येथे होणाऱ्या ‘मोबाइल वर्ल्ड काँग्रेस’मध्ये हा AI Robot Phone प्रथमच प्रदर्शित केला जाणार आहे. फोल्डेबल कॅमेराची टिकाऊपणा आणि या फोनची किंमत अद्याप उघड झालेली नाही, पण तज्ञांच्या मते, हा फोन कंटेंट क्रिएटर्स आणि व्हिडिओ मेकर्ससाठी ‘गेम चेंजर’ ठरू शकतो. हाताच्या हालचालींमुळे व्हिडिओ हलणार नाही, स्वयंचलित ट्रॅकिंगमुळे शूटिंग अधिक अचूक होईल आणि एआयला स्वतः समजेल की काय आणि कसे शूट करायचे.

ऑनर ही 2013 मध्ये हुआवेईच्या सब-ब्रँड म्हणून सुरू झालेली कंपनी असून, आज ती स्वतंत्र आणि सरकार-समर्थित कंपनी आहे. तिच्या उत्पादनांमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅब्लेट आणि स्मार्टवॉचचा समावेश आहे. उत्कृष्ट कॅमेरे, वेगवान प्रोसेसर आणि लांब बॅटरी लाइफ यामुळे ऑनरचे प्रॉडक्ट भारतातही लोकप्रिय झाले आहेत.

या आगामी रोबोट फोनमुळे स्मार्टफोन जगात एक नवा युगप्रवेश नक्कीच होणार आहे

Comments
Add Comment