अनेकांचे प्रभाग कायम राखले
मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २२७ प्रभागांकरता आरक्षण सोडत मंगळवारी वांद्र्यातील बालगंधर्व नाट्यगृहात पार पडली. या प्रभाग आरक्षण सोडतीत माजी विरोधी पक्षनेते रवी राजा, माजी महपौर स्नेहल आंबेकर, मिलिंद वैद्य, माजी सभागृहनेत्या विशाखा राऊत, माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव. माजी सुधार समिती अध्यक्ष सदा परब, माजी बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर, अनिल पाटणकर, योगीराज दाभाडकर, ऍड मकरंद नार्वेकर, नील सोमय्या,अतुल शाह तसेच काँग्रेस आसिफ झकेरिया यांना मोठा फटका बसला आहे. यासर्वांना आसपासच्या प्रभागांमध्ये घुसखोरी करण्याची वेळ आली असली तरी अनेकांना आसपाही प्रभाग राखीव नसल्याने त्यांना घरी बसण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही.
मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागांची आरक्षण सोडत निश्चितीचा कार्यक्रम मंगळवारी सकाळी पार पडला. महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक विभागाच्यावतीने प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात आली. या प्रभाग आरक्षण सोडतीसाठी महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी, सहआयुक्त विश्वास शंकरवार, उपायुक्त विश्वास मोटे, सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे, पल्लेवाड तसेच निवडणूक विभागाचे विशेष कार्य अधिकारी विजय बालमवार आदींसह निवडणूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते. महापालिका शाळेतील मुलांच्यावतीने या सोडतीतील प्रभाग आरक्षणाच्या चिठ्या काढण्यात आल्या.
अनुसूचित जातीचे राखीव प्रवर्ग : १५
महिला प्रभाग : ०८ (१३३, १८३,१४७,१८६,१५५,)
११८,१५१,१८९
पुरुष प्रभाग :०७( १४०,२१५,१४१,१४६,९३,१५२,२६)
अनुसूचित जमाती राखीव प्रवर्ग : ०२
महिला प्रभाग : ०१, (१२१)
पुरुष प्रभाग : ०१ (५३)
नागरिकांचा मागासवर्ग राखीव प्रवर्ग : ६१
महिला प्रभाग : ३१,
(५२,४६,१५८,१५०,३३,,०६,१२,,१६७,११७,१०८,१२८,८०,१००,१९,८२,४९,११,१७६,२१६,१९१,१७०,१३,१०५,१९८,७२,१५३,१२९,१८,०१,३२,२७)
पुरुष प्रभाग: ३०
(४१,६३,१९३,१९५,१८७,९१,१३७,१३०,२२३,१७१, ८७,२२२,१३६,१११,१०,१३८,७६,२१९,०४, २२६,२०८,११३,४५,१८२,५०,९५,६९,७०,८५,१३५)
सर्वसाधारण राखीव प्रवर्ग : १४९
महिला प्रभाग : ७४,
(१२६,१०३,१८४,५१,१३२,१३१,०२, ०८, ७९,१७४,१२४,१९९, १४२,११४, १७,१०१,४४,२२४, ८४,६६,२०१,२०५,३८, ९६, ७१, ११२,१७९, ११६, १६३, ८३,१५६, १७२,८१, ७८, २८, ८८, १५, ३१,२४, १३४, १८०, २०९,९४, ११५, १७५, १९७, १५७, २०३,१६,,९७, २१२, २२०,७४,२१, ७७, ६१, ६४, ७३, ११०, ६०, १७७, १७३, ३७, १४,१३९,२१८,२२७,३९, ४२,१२७, १९६, १४३, ५६, २१३)
पुरुष प्रभाग ७५
(३, ५,७,९, २०, २२, २३, २५, २९, ३०, ३४, ३५,३६, ४०, ४३,४७,४८, ५४, ५५, ५७,५८,५९, ६२, ६५, ६७, ६८, ७५, ८६, ८९, ९०, ९२, ९८, १०४, १०६, १०७, १०९, ११९, १२०, १२२,:१२३, १२५,१४४, १४५, १४८, १४९, १५४, १५९, १६०, १६१, १६२, १६४, १६५, १६६, १६८,१६९,१७८,१८१, १८५, १८८, १९०,१९२, १९४, २००, २०२, २०४, २०६, २०७,२१०,२११, २१४, २१७, २२१,२२१,)






