मोहित सोमण: विकली निफ्टी एक्स्पायरीपूर्व कालावधीत शेअर बाजारात चांगली वाढ झाली आहे. सकाळची घसरण दुपारी व अखेरच्या सत्रात तेजीत बदलली गेल्याने गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातील विश्वास अस्थिरततेही द्विगुणित केल्याने आज गुंतवणूकदारांनी आपल्या पोर्टफोलिओतील खरेदीत वाढ केली आहे. अखेरच्या सत्रात सेन्सेक्स ३३५.९७ अंकांनी वधारत ८३८७१.३२ अंकांवर बंद झाला असून निफ्टी १२०.६० अंकांने वधारला असून २५६९४.९५ पातळीवर स्थिरावला आहे. सलग चौथ्यांदा आयटी शेअर्समध्ये वाढ झाल्याने दरपातळी सकारात्मकतेत बदलण्यास बाजारात मदत झाली. मात्र सकाळी नकारात्मक पातळीवर असलेला अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) १.५४% उसळल्याने किंमत पातळीतील अस्थिरता अधोरेखित झाली आहे. बँक निर्देशांकात झालेल्या वाढीसह मिड स्मॉल कॅप शेअर्समध्येही वाढ झाल्याने बाजाराला सपोर्ट लेवल मिळण्यास मदत झाली आहे.
अखेरच्या सत्रात निफ्टी व्यापक निर्देशांकात (Nifty Borader Indices) निफ्टी १०० (०.४२%), निफ्टी (०.४३%), मिडकॅप ५० (०.५८%) सह इतर निर्देशांकातही वाढ झाली असून निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices) सर्वाधिक वाढ आयटी (१.२०%),ऑटो (१.०७%), प्रायव्हेट बँक (०.३६%), मिडस्मॉल आयटी टेलिकॉम (१.६६%) निर्देशांकात सर्वाधिक वाढ झाली आहे तर सर्वाधिक घसरण फायनांशियल सर्व्हिसेस एक्स बँक (१.४५%), मिडस्मॉल हेल्थकेअर (०.७०%) निर्देशांकात झाली आहे. तथापि शेअर बाजारातील वाढ कायम असली तरी एनएसईत (National Stock Exchange NSE) ३२०२ समभागापैकी १५६१ समभागात (Stocks) वाढ झाली असून १५६२ समभागात घसरण झाली आहे. आज एनएसईत ७५ शेअर अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर ७६ शेअर लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत.
आज जागतिक अस्थिरतेच्या काळात कमोडिटी तील हालचालही अस्थिरच राहिली आहे. सोन्याच्या बाजारातील आजच्या दरात तुफान वाढ झाली आहे. तर कच्च्या तेलाच्या (Crude Oil) निर्देशांकातही आज दिवसभरात मोठी वाढ झाली आहे. रुपयांच्या तुलनेत डॉलरमध्ये किरकोळ घसरण झाल्याने आज बाजाराला वाढत्या रूपयांचा फायदाही बाजारात झालेला पहायला मिळाला आहे. युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीवरील अनिश्चितता कायम असल्याने गुंतवणूकदार सातत्याने सोन्याचांदीतील गुंतवणूक वाढवत असल्याने किंमतीत मोठी वाढ होत आहे. लागत असलेल्या संमिश्र तिमाही निकालादरम्यान मंथली एक्सपायरी आल्याने गुंतवणूकदारांनी आज खरेदी वाढवल्याचे बाजारात जाणवले आहे.
बाजार तज्ञांच्या मते, तांत्रिकदृष्ट्या, निफ्टीने पुन्हा एकदा २५४५०-२५५०० सपोर्ट झोनचे रक्षण केल्यानंतर इंट्राडे चार्टवर तेजीचा उलटा पॅटर्न तयार केला आहे ज्यामुळे खालच्या पातळीवर खरेदीची (Down Side Buy) तीव्र उत्सुकता दिसून येते. २५७००-२५८२० पातळीच्या वरचा बंद हा वाढीचा ट्रेंड पुन्हा मजबूत करू शकतो आणि २६०००-२६३०० पातळीच्या दिशेने मार्ग मोकळा करू शकतो. तात्काळ आधार आता २५५०० पातळीपर्यंत वाढला आहे, ज्यामुळे निर्देशांकाची रचनात्मक सेटअप मजबूत झाली आहे. एकूणच, भावना सकारात्मक राहते अस्थिरता कमी होत आहे आणि स्थिर सकारात्मक होत आहे हे कमी श्रेणींमध्ये गुंतवणूकदारांचा विश्वास वाढताना दर्शवते.' असे म्हटले आहे.
आज अखेरच्या सत्रात आशियाई बाजारातील गिफ्ट निफ्टी (०.६०%), स्ट्रेट टाईम्स (१.१९%), कोसपी (०.८१%) निर्देशांकात सर्वाधिक वाढ झाली असून सर्वाधिक घसरण मात्र शांघाई कंपोझिट (०.४०%), तैवान वेटेड (०.३०%), सेट कंपोझिट (०.४५%), जकार्ता कंपोझिट (०.३०%), निकेयी २२५ (०.५३%) निर्देशांकात झाली आहे. युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात तिन्ही बाजारातील डाऊ जोन्स (०.०५%), एस अँड पी ५०० (१.५४%), नासडाक (२.२९%) निर्देशांकात वाढ झाली आहे.
अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ पॉली मेडिक्यूअर (१०.८%), वोडाफोन आयडिया (७.७९%), लेटंट व्ह्यू (६.५८%), हिंदुस्थान कॉपर (६.४४%), क्राफ्ट्समन ऑटो (५.६९%), भारत फोर्ज (५.५५%), एचएफसीएल (५.५०%), एथर एनर्जी (५.४५%), ज्योती सीएनसी ऑटो (५.१३%), भेल (४.५५%) निर्देशांकात झाली आहे.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण टीआरआयएल (१०.००%), एचबीएल इंजिनिअरिंग (९.५२%), बजाज फायनान्स (७.३५%), बजाज फिनसर्व्ह (६.०९%), सीई इन्फोसिस्टिम (४.५७%), सफायर फूडस (३.६६%), बजाज होल्डिंग्स (३.६३%), फोर्स मोटर्स (३.४३%), सेंट्रल बँक (३.३१%), देवयानी इंटरनॅशनल (३.१४%) निर्देशांकात झाली आहे.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'दिल्ली स्फोटाच्या संभाव्य परिणामांबद्दलच्या चिंतेमुळे देशांतर्गत बाजार मंदावला. तथापि, अमेरिकन सिनेटने आतापर्यंतचा सर्वात मोठा संघीय बंद संपवण्याचे विधेयक मंजूर केल्याने जागतिक संकेतांमुळे ते हुशारीने सावरले आणि दिवसाच्या उच्चांकावर बंद झाले. महत्त्वाचे म्हणजे, दुसऱ्या तिमाहीच्या निकालांचा हंगाम संपण्याच्या जवळ आला आहे आणि व्यापक बाजारपेठेच्या अपेक्षेपेक्षा चांगल्या कामगिरीमुळे तो सकारात्मक पातळीवर संपेल अशी अपेक्षा आहे. आयटी, ऑटो, धातू आणि एफएमसीजी क्षेत्रातील वाढीमुळे ही तेजी कायम राहिली. गुंतवणूकदार आता आगामी देशांतर्गत चलनवाढीच्या आकडेवारीची वाट पाहत आहेत, अन्नधान्याच्या किमतींमध्ये सतत घट झाल्यामुळे सतत नियंत्रण राहण्याची अपेक्षा आहे - आरबीआयकडून धोरणात्मक सवलती मिळण्याची शक्यता वाढली आहे. पुढे पाहता, तिसऱ्या तिमाहीत उत्पन्नात जोरदार वाढ होण्याची अपेक्षा आहे, ज्याला अनेक देशांतर्गत टेलविंड्सचा आधार आहे, जरी बरेच काही अमेरिकेसोबतच्या व्यापार कराराच्या यशस्वी अंतिमीकरणावर अवलंबून असेल.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की,'मंगळवारी भारतीय बाजारांमध्ये अत्यंत अस्थिर सत्र दिसून आले, बिहार राज्य निवडणुकीपूर्वी सावध भावनांमुळे बेंचमार्क निफ्टी नफा आणि तोट्यात चढउतार करत होता. कमकुवत सुरुवातीनंतर, निर्देशांक दिवसाच्या २५४४९ पातळीच्या नीचांकी पातळीवरून वेगाने वाढून २५६९९ पातळीच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला, जो तेजी आणि मंदी यांच्यातील रस्सीखेच दर्शवितो. जागतिक पातळीवर, सरकारी शटडाऊन संपवण्याच्या विधेयकाला अमेरिकन सिनेटने मान्यता दिल्याने जागतिक बाजारपेठांमध्ये पुन्हा अस्थिरतेची अपेक्षा वाढल्याने बाजारातील भावना चिंतेत राहिल्या. क्षेत्रीयदृष्ट्या, आयटी, ऑटो आणि मेटल शेअर्समध्ये ताकद दिसून आली, ज्यामुळे निर्देशांक सुरुवातीच्या तोट्यातून सावरण्यास मदत झाली. एकूणच, देशांतर्गत राजकीय संकेत आणि जागतिक घडामोडी बाजाराची दिशा ठरवत असल्याने सहभागी सावध राहिले.'






