Saturday, December 13, 2025

मुंबईत ओबीसी प्रभाग कोणते आहेत, जाणून घ्या

मुंबईत ओबीसी प्रभाग कोणते आहेत, जाणून घ्या

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सन २०२५च्या सार्वत्रिक निवडणुकीकरता प्रभाग आरक्षण सोडत मंगळवारी ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी काढण्यात येत असून या पहिल्या टप्प्यात अनुसूचित आणि अनुसूचित जमाती प्रवर्ग करता उतरत्या क्रमाने लोकसंख्येनुसार सोडत काढण्यात आली. त्यानंतर उर्वरित प्रभाग क्रमांकाच्या चिठ्ठ्यामधून ६१ चिठ्ठ्या नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग करता काढण्यात आल्या. त्यातून ३१ महिला आरक्षित प्रभागांच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. त्यानंतर उर्वरित चिठ्ठ्या मधून पुरुष तथा खुल्या ओबीसी प्रवर्ग करता राखीव करण्यात आले.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार निवडणूक विभागाने आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली. यातील २२७ प्रभागांच्या चिठ्ठ्या दाखवण्यात आल्या. त्यातून अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती याकरता सोडत काढण्यात आली. त्यानंतर मागासवर्गीय प्रवर्ग करता अर्थात ओबीसी करता आरक्षण सोडत काढण्यात आली.याप्रसंगी महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त शहर अश्विनी जोशी, सहआयुक्त विश्वास शंकरवार, निवडणूक विभागाचे ओ एस डी विजय बालमवार, उपायुक्त विश्वास मोटे, सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे, पल्लेवाड,आदी उपस्थित होते.

नागरिकांचा मागासवर्ग राखीव प्रवर्ग : ६१

महिला प्रभाग : ३१,

(५२,४६,१५८,१५०,३३,,०६,१२,,१६७,११७,१०८,१२८,८०,१००,१९,८२,४९,११,१७६,२१६,१९१,१७०,१३,१०५,१९८,७२,१५३,१२९,१८,०१,३२,२७)

पुरुष प्रभाग: ३०

(४१,६३,१९३,१९५,१८७,९१,१३७,१३०,२२३,१७१, ८७,२२२,१३६,१११,१०,१३८,७६,२१९,०४, २२६,२०८,११३,४५,१८२,५०,९५,६९,७०,८५,१३५)

Comments
Add Comment