Saturday, December 13, 2025

मुंबईतील सर्वसामान्य प्रवर्गाचे प्रभाग कोणते आहेत, जाणून घ्या

मुंबईतील सर्वसामान्य प्रवर्गाचे प्रभाग कोणते आहेत, जाणून घ्या

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सन २०२५च्या सार्वत्रिक निवडणुकीकरता प्रभाग आरक्षण सोडत मंगळवारी ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी काढण्यात येत असून या पहिल्या टप्प्यात अनुसूचित आणि अनुसूचित जमाती प्रवर्ग तसेच नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग करता ६१ जागाकरता आरक्षण सोडत काढल्यानंतर उर्वरित १४९ जागा करता सर्वसामान्य प्रवर्ग करता आरक्षण काढण्यात आले.यात महिला खुला प्रवर्ग करता ७४ आणि पुरुष प्रवर्ग करता ७५ जागा करता सोडत काढण्यात आली.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार निवडणूक विभागाने आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली. यातील २२७ प्रभागांच्या चिठ्ठ्या दाखवण्यात आल्या. त्यातून अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती याकरता सोडत काढण्यात आली. त्यानंतर मागासवर्गीय प्रवर्ग करता अर्थात ओबीसी करता आरक्षण सोडत काढण्यात आली.याप्रसंगी महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त शहर अश्विनी जोशी, सहआयुक्त विश्वास शंकरवार, निवडणूक विभागाचे ओ एस डी विजय बालमवार, उपायुक्त विश्वास मोटे, सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे, पल्लेवाड,आदी उपस्थित होते.

सर्वसाधारण राखीव प्रवर्ग १४९

महिला प्रभाग ७४,

(१२६,१०३,१८४,५१,१३२,१३१,०२, ०८, ७९,१७४,१२४,१९९, १४२,११४, १७,१०१,४४,२२४, ८४,६६,२०१,२०५,३८, ९६, ७१, ११२,१७९, ११६, १६३, ८३,१५६, १७२,८१, ७८, २८, ८८, १५, ३१,२४, १३४, १८०, २०९,९४, ११५, १७५, १९७, १५७, २०३,१६,,९७, २१२, २२०,७४,२१, ७७, ६१, ६४, ७३, ११०, ६०, १७७, १७३, ३७, १४,१३९,२१८,२२७,३९, ४२,१२७, १९६, १४३, ५६, २१३)

पुरुष प्रभाग ७५

(३, ५,७,९, २०, २२, २३, २५, २९, ३०, ३४, ३५,३६, ४०, ४३,४७,४८, ५४, ५५, ५७,५८,५९, ६२, ६५, ६७, ६८, ७५, ८६, ८९, ९०, ९२, ९८, १०४, १०६, १०७, १०९, ११९, १२०, १२२,:१२३, १२५,१४४, १४५, १४८, १४९, १५४, १५९, १६०, १६१, १६२, १६४, १६५, १६६, १६८,१६९,१७८,१८१, १८५, १८८, १९०,१९२, १९४, २००, २०२, २०४, २०६, २०७,२१०,२११, २१४, २१७, २२१,२२१,)

Comments
Add Comment