Thursday, March 26, 2026

इस्लामाबादमध्ये स्फोट! अपघात की घातपात?

इस्लामाबादमध्ये स्फोट! अपघात की घातपात?

इस्लामाबाद: इस्लामाबाद न्यायालयाबाहेर आज दुपारी १२:३० च्या सुमारास एक मोठा स्फोट झाला. ज्यात सहा जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत. इस्लामाबाद न्यायालय संकुलाच्या पार्किंग क्षेत्रात एक कार उभी होती. या कारमध्ये हा स्फोट झाला. ज्याचा आवाज आजूबाजूच्या परिसरात दूरवर पोहोचला.

स्थानिक पोलिसांच्या म्हणण्यानुसार, न्यायालय परिसरात प्रचंड वाहतूक आणि गर्दी असताना हा स्फोट झाला. या स्फोटात न्यायालयातील अनेक वकील आणि नागरिक जखमी झाले आहेत. स्फोटात जखमी झालेल्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी स्फोट झालेला परिसर सील केला असून प्राथमिक तपास सुरू केला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सिलेंडरच्या स्फोटामुळे हा अपघात झाल्याचे सूचित झाले आहे. पोलिसांनी सांगितले की, सध्या हा सिलेंडरचा स्फोट असल्याचे दिसून येत आहे, परंतु याबाबत सखोल तपास सुरू आहे. स्फोटाचे कारण आणि संभाव्य निष्काळजीपणा किंवा इतर घटकांचा तपास करण्यासाठी सुरक्षा दल आणि फॉरेन्सिक पथके घटनास्थळी तैनात करण्यात आली आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >