Monday, November 10, 2025

मुख्यमंत्र्यांच्या घरातील किचन क्विन कोण? सकाळच्या नाश्त्याला काय आहार करतात अमृता फडणवीस?

मुख्यमंत्र्यांच्या घरातील किचन क्विन कोण? सकाळच्या नाश्त्याला काय आहार करतात अमृता फडणवीस?

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस सुद्धा नेहमी चर्चेत असतात. त्या राजकारणी पार्श्वभूमीच्या नसल्या तरी त्यांना इतर क्षेत्रामध्ये रस आहे. नुकतीच कर्ली टेल या या यूट्युब वाहिनीने अमृता फडणवीस यांची मुलाखत घेतली. ज्यात संपूर्ण वर्षा बंगल्याची माहिती, वैयक्तिक आयुष्य, घरातील स्वयंपाक याबद्दल चर्चा करण्यात आल्या असून प्रेक्षकांनी या मुलाखतीला उत्तम प्रतिसाद दिला आहे.

कर्ली टेलने आजवर अनेक दिग्गज लोकांच्या घराची सहल केली आहे. ज्यात विशेष आकर्षण हे दिग्गजांच्या घरातील 'फुड टूर' चे आहे. या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी कर्ली टेल सोबत वर्षा बंगल्यात नाष्टा करत घरातील स्वयंपाकाबद्दल माहिती दिली. तसेच घरातील किचन क्वीन कोण याबाबतही सांगितले.

कर्ली टेलने अमृता यांना तुम्हाला स्वयंपाक येतो का? तुम्ही कधी स्वयंपाक घरात येता का? असे विचारल्यावर त्यांनी सांगितले, मी फारशी येत नाही, क्वचितच येते. पण कधी कोणी कूक नसेल तर मी मुगाची खिचडी उत्तम बनवते.

तर घरामधील किचन क्वीन कोण? यावर त्या म्हणाल्या की, आमच्या घरात माझ्या सासूबाई याच किचन क्वीन होत्या. घरात जेवण काय बनणार हे सगळं त्या ठरवायच्या आणि स्वयंपाक करणाऱ्यांना सांगायच्या. त्यानंतर हळूहळू मधल्या काळात मी ती जागा घेतली होती पण मला फारसं जमलं नाही. त्यानंतर आता आमची मुलगी दिविजा किचन क्वीन आहे.

रोज सकाळी नाश्ता काय बनणार, आजचे जेवण काय असेल हे सगळं ती स्वतः ठरवते. सध्या ती आहाराबाबत फार काळजी घेते. या गोष्टीमध्ये ती फार रिसर्च करते आणि शरीरासाठी पौष्टीक असलेल्या गोष्टी करायला सांगते. तिच्यामुळे स्वयंपाक पौष्टीक बनतो.

कर्ली टेल सोबत नाश्ता करताना सुद्धा विविध पौष्टीक पदार्थ टेबलवर दिसले. ज्यात शेवग्याच्या शेंग्यांचे सूप, विविध धान्यांपासून बनवलेला पौष्टिक पिझ्झाचा बेस आणि त्यावर टोमॅटो, पनीर, कांदा, मशरूम या भाज्या, घरी बनवलेला सॉस, टोफू ब्रेड, पनीर रोल, बीट चिला, अवाकाडो टोस्ट यासारखे पदार्थ दिसले.

Comments
Add Comment