Sunday, November 9, 2025

राज्यात तापमानाचा पारा घसरला! महाबळेश्वरपेक्षा जळगावात थंडी वाढली

राज्यात तापमानाचा पारा घसरला! महाबळेश्वरपेक्षा जळगावात थंडी वाढली

मुंबई: हिमालयात चार दिवसांपूर्वी झालेल्या हिमवृष्टीमुळे मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील तापमानाचा पारा घसरला आहे. यामुळे गारवा जाणवू लागला आहे. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार येत्या शुक्रवारपर्यंत किमान तापमानाचा पारा कमी राहणार असल्याने ऑक्टोबर हिटने त्रासलेल्यांना आता शेकोटीची तयार करावी लागणार आहे. येत्या काही दिवसात मध्य भारतात थंडीची लाट येणार असून रात्रीचं तापमान दोन ते चार अंशांनी घसरण्याची शक्यता आहे.

रविवार, ९ नोव्हेंबरला नोंदवलेल्या तापमानात जळगावचा पारा १०.५ अंश सेल्सियस तर महाबळेश्वरचे तापमान १३.२ अंश सेल्सिअर नोंदविण्यात आले होते. या आकड्यांवरून थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरला पहिल्यांदाच जळगावने मागे टाकल्याचे दिसते. तर मुंबई १९.६, बीड ११.८, नाशिक १२.५, अहिल्यानगर १२.५, छत्रपती संभाजीनगर १२.८, महाबळेश्वर १२.८, परभणी १२.६, मालेगाव १४, पुणे १४.३, सातारा १४.५, धाराशिव १५, नांदेड १५.१, सोलापूर १५.६, नंदुरबार १६.२, सांगली, १६.९, माथेरान १७.४ आणि ठाणे २३ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा