Sunday, November 30, 2025

शाळेची बस १५० फूट दरीत कोसळली; दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

शाळेची बस १५० फूट दरीत कोसळली; दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

नंदुरबार : जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला. देवगोई घाटातल्या अमलीबारी जवळ एक स्कूल बस १०० ते १५० फूट खोल दरीत कोसळली. बसमध्ये २० ते २५ विद्यार्थी होते. या दुर्घटनेत आतापर्यंत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून जवळपास तीसहून अधिक विद्यार्थी जखमी झाले. घटनेनंतर स्थानिक नागरिकांकडून मदतीचे काम सुरू करण्यात आले. तसेच प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर इतर जखमी विद्यार्थ्यांवर अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयातच उपचार सुरू आहेत.

नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा आणि मोलगींला जोडणाऱ्या देवगोई घाटात चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे येथील अनुदानित आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी शालेय बस दरीत कोसळून अपघात झाला. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आपल्या गावाकडे आलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत नेण्यासाठी ही बस अक्कलकुव्याच्या मोलगी परिसरात आली होती.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >