सांगली : विटा शहरात एका तीन मजली इमारतीला आग लागली. इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या स्टील फर्निचरच्या दुकानातून आगीची सुरुवात झाली. आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले आणि ती तिन्ही मजल्यांवर पसरली. या दुर्घटनेत इमारतीमधील एका कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन वर्षांच्या एका चिमुकलीचा समावेश आहे. दोन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक अंदाजानुसार आग शॉर्ट सर्किटमुळे लागली. आगीत पूर्ण इमारत जळून खाक झाली. आग प्रकरणी नियमानुसार चौकशी होईल आणि दोषी आढळलेल्यांवर कारवाई होईल.
आग रात्री उशिरा लागली. ज्यावेळी आग लागली त्यावेळी जोशी कुटुंब गाढ झोपेत होते त्यामुळे आग पसरली तरी त्यांना संकटाची जाणीव झाली नाही. जेव्हा लक्षात आले त्यावेळी वेळ निघून गेली होती.
सांगली जिल्ह्यातील विटा शहरात इमारतीला आग, चौघांचा मृत्यू
विष्णू जोशी (४७) - कुटुंबप्रमुख
सुनंदा विष्णू जोशी (४२) - कुटुंबप्रमुखाची पत्नी
प्रियांका योगेश जोशी (२५) - कुटुंबप्रमुखाची मुलगी
सृष्टी इंगळे (२) - कुटुंबप्रमुखाची नात






