प्रतिनिधी:मेहली मिस्त्री यांनी अचानक युटर्न घेत आपले महाराष्ट्र धर्मादायी आयुक्तालयात दिलेले कॅवेट काढून घेतले आहे. त्यामुळे टाटा समुहाच्या संचालक मंडळातील एकप्रकारे आपला हिस्सा सोडल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. प्रामुख्याने आपली बाजू न ऐकता आपल्याला टाटा संचालक मंडळाने काढले असे म्हणणे त्यांनी आयुक्तांकडे मांडले होते त्यामुळे कुठल्याही नियुक्तीचा निर्णय घेताना आपली बाजू न मांडण्याआधी निर्णयाला स्थगिती द्यावी याची विनंती त्यांनी नियामकाला केली होती. मात्र स्वखुषीने पुन्हा त्यांनी आपल्या कॅवेट काढून घेतले आहे. त्यामुळे धर्मादाय आयुक्तांकडे नव्याने प्रस्ताव पाठवलेला प्रस्ताव टाटा समुहानेही मागे घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
टाटा समुह देखील कायदेशीर पेचप्रसंग लढण्यासाठी सज्ज झाला होता मात्र आता कॅवेट काढल्याने अघोषित समझोता झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थात आपल्या आधीच्या टाटा समुहाला लिहीलेल्या पत्रकाप्रमाणे, 'टाटा समुहात कुठलीही वादग्रस्त घटनांशी जोडला जाऊ नये अशी माझी इच्छा ' असल्याचेही त्यांनी पुनरुच्चार अनेक वादावर आता पडदा पडण्याची शक्यता आहे. बहुमताच्या आधारावर मेहली मिस्त्री यांची संचालक मंडळातून हकालपट्टी करण्यात आली होती. गेल्या महिन्यात टाटा समुहाच्या संचालक मंडळाच्या संचालकांची मुदत संपली होती. मात्र संचालक विजय सिंह यांच्यासह सी वेणुगोपाल यांना मुदतवाढ देण्यात आली होती. यापूर्वी नोएल टाटा यांची रतन टाटा यांच्या निधनानंतर ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली होती.
नोएल टाटा अध्यक्ष झाल्यापासून आणखीनच कंपनीचे प्रभावशाली भागभांडवलधारक व माजी संचालक व शापोरजी पालोनजी समूहाचे सर्वेसर्वा मेहली मिस्त्री यांच्यात संघर्ष सुरु झाला होता. शापोरजी पालोनजी समुहाकडे टाटा सन्समधील १७% भागभांडवल (Stake) आहे तर टाटा ट्रस्टचा (टाटा कुटुंबाचा) ६६% भागभांडवल कंपनीत आहे.






